बोरीवली रेल्वे स्थानकाचे रूपडे पालटले

By admin | Published: May 16, 2017 03:03 AM2017-05-16T03:03:46+5:302017-05-16T03:03:46+5:30

देशातील ३२ रेल्वे स्थानकांपैकी मुंबईतील पहिले अत्याधुनिक रेल्वे स्थानकाचा मान येथील बोरीवली स्थानकाला मिळाला आहे. पश्चिम उपनगरातील महत्त्वाचे रेल्वे

The shape of the Borivli railway station has changed | बोरीवली रेल्वे स्थानकाचे रूपडे पालटले

बोरीवली रेल्वे स्थानकाचे रूपडे पालटले

Next

मनोहर कुंभेजकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील ३२ रेल्वे स्थानकांपैकी मुंबईतील पहिले अत्याधुनिक रेल्वे स्थानकाचा मान येथील बोरीवली स्थानकाला मिळाला आहे. पश्चिम उपनगरातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ख्याती असलेल्या या स्थानकाचे रूपडे पालटले आहे. अद्ययावत स्थानकाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दुपारी अडीच वाजता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे.
नव्या सुविधांमध्ये प्रामुख्याने पूर्वी असलेल्या एक क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची रुंदी ६ मीटर वरून १२ मीटर करण्यात आली आहे. तसेच येथे ४ मोठे जंबो पंखे आणि प्रवाशांना बसण्यासाठी सुमारे ४६ ठिकाणी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.
प्लॅटफॉर्म १ वर ३८ खांबांवर ३२७ मीटर लांब आणि १०५ मीटर रुंद असा डेक तयार करण्यात आला असून याला जोडण्यासाठी ५ सरकते जिने, ५ पादचारी पूल आणि सध्या १ लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या डेकमुळे प्रवासी त्यांना हव्या त्या दिशेला सहज जाऊ शकतील आणि पूर्वी फलाटावर होणारी गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

आज लोकार्पण
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून २०१४ मध्ये या रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले. खासदार शेट्टी यांनी सदर काम योग्य आणि जलदगतीने होण्यासाठी पाठपुरावा केला होता. आता हे काम पूर्ण झाले असून मंगळवारी दुपारी अडीच वाजता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे.
२ूएकूण ८ फलाट असलेल्या या स्थााकावरून रोज सुमारे ३ लाख प्रवासी प्रवास करतात. राजधानी एक्स्प्रेससह बाहेरगावच्या १०० गाड्या आणि स्लो ट्रेन, मध्यम जलद ट्रेन, अति जलद अशा सुमारे ९३७ लोकल या स्थानकावर थांबतात. रेल्वेला ४५ लाख रुपये उत्पन्न मिळते. रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटल्यामुळे आता या स्थानकावरून प्रवास करणे प्रवाशांसाठी अधिक सोयीचे होणार आहे.

Web Title: The shape of the Borivli railway station has changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.