Join us  

Sharad Pawar: "मुख्यमंत्री आज मंत्रालयात आले का, अरे व्वा"; पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 2:09 PM

मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठिक नव्हती, हे एक कारण होतं. मी अनेक राज्यात पाहतो, मुख्यमंत्री हे घरी बसून निर्णय घेतात

मुंबई - कोरोना लॉकडाऊनपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्क फ्रॉम होमने कामकाज पाहत होते. जवळपास दोन वर्षानंतर त्यांनी आज मंत्रालयात हजेरी लावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री मंत्रालयात येत असे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात दाखल होताच विविध विभागाचा दौरा केला. यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनीही आज आले का? अर्रे वा... असे म्हणत, भुवया उंचवत आश्चर्य व्यक्त केले. तसेच, ते मंत्रालयात आले मला आनंद आहे, असेही त्यांनी म्हटले.  

मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठिक नव्हती, हे एक कारण होतं. मी अनेक राज्यात पाहतो, मुख्यमंत्री हे घरी बसून निर्णय घेतात. वर्षावर ती सगळी व्यवस्था आहे, त्यामुळे ते मंत्रालयात आले किंवा नाही आले राज्याचा कारभार थांबलेला नाही. ते आवश्यक त्या महत्त्वाच्या फाईल्स क्लेअर करतात, निर्णय घेतात. त्यामुळे, याबद्दलची चिंता माझ्या मनात नाही. ते आता आलेत मला आनंद आहे, असे म्हणत पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आगमनाचे स्वागत केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नसल्याच्या मुद्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. भाजप नेते सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन प्रश्न विचारत होते. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाची पायरी चढली. यावेळी, विविध कार्यालयात जाऊन पाहणी दौराही केला. याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर, मुख्यमंत्री आज आले का? अर्रे व्वा... अशी आश्चर्यजनक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. 

अनेक कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर उद्धव ठाकरे यांना प्रकृती अस्वस्थाचा त्रास होऊ लागला होता. शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना वैद्यकीय कारणास्तव विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. या शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहण्यावर मर्यादा आल्या होत्या. मात्र, बहुतांश कार्यक्रमास ते ऑनलाईन उपस्थिती लावत होते. भाजप नेत्यांनी मुख्यंत्र्यांच्या उपस्थितीवरुन टीका केली असता, महाविकास आघाडीचे नेते त्यांची पाठराखण करत होते. शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवरुन त्यांच्या वर्क फ्रॉम होमला पाठिंबा दिला होता होता.  

टॅग्स :शरद पवारमुख्यमंत्रीकोरोना वायरस बातम्या