चंद्रकांत पाटलांची टीका, पवारांनी छगन भुजबळ अन् नाईकां शिवसेनेतून बाहेर काढले तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 04:08 AM2019-08-01T04:08:16+5:302019-08-01T06:57:22+5:30

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या चार आमदारांसह राज्यातील डझनभर नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Sharad Pawar criticizes Chandrakant Patil, Sharad Pawar when he leaves Shiv Sena | चंद्रकांत पाटलांची टीका, पवारांनी छगन भुजबळ अन् नाईकां शिवसेनेतून बाहेर काढले तेव्हा...

चंद्रकांत पाटलांची टीका, पवारांनी छगन भुजबळ अन् नाईकां शिवसेनेतून बाहेर काढले तेव्हा...

googlenewsNext

मेगा भरती : राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच ही वाट दाखविली - मधुकर पिचड


मुंबई : देश ज्या बाजूला आहे, महाराष्ट्र ज्या बाजूला आहे. त्या बाजूला गेले पाहिजे, असा निर्णय कार्यकर्त्यांनी आणि तरूण नेत्यांनी घेतला. त्यामुळे भाजपमध्ये येण्याचा निर्णय सर्वांनी घेतला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच आम्हा सर्वांना ही वाट दाखविल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी बुधवारी स्पष्ट केले.

गरवारे क्लब येथील कार्यक्रमात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मधुराव पिचड, आमदार वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक आणि कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईकसुद्धा भाजपमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, विनोद तावडे, राधाकृष्ण विखे पाटील, सुभाष देशमुख, राम शिंदे आदी नेते उपस्थित होते. भाजपात प्रवेश करणाऱ्या आमदार, नेत्यांच्यावतीने मधुकर पिचड यांनी भावना व्यक्त केल्या. पक्षांतरामागील गुपित सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही हुशार आहोत. आधी आम्ही सुजय यांना घेतले. मग, राधाकृष्ण विखे आपोआप आले. तसेच आधी वैभव यांना घेतले. त्यामुळे मधुकररावसुद्धा आले. रणजितसिंह मोहिते पाटील यांना घेतले मग विजयसिहांना आशीर्वाद द्यावाच लागला. आता संदीप नाईक आणि त्यांच्यासोबत नवी मुंबईतले नगरसेवक देखील आले आहेत. मग गणेश नाईकांनाही आशीर्वादासाठी यावेच लागेल. चिंता करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

कर्तृत्वानुसार मानसन्मान
भाजपच्या विकासाचे काम पाहून ते इकडे आले आहे. शिवाय, त्यांच्या येण्याने जुन्यांवर कोणताच अन्याय होणार नाही. सर्वांची काळजी घेतली जाईल. विधानसभेपर्यंत अजून खूप प्रवेश होतील. आलेल्यांना आणि येणाऱ्यांना त्यांच्या कर्तृत्वानुसार जागा आणि मान-सन्मान दिले जाईल, असे पाटील म्हणाले. याप्रसंगी सुधीर मुनगंटीवार यांचेही भाषण झाले.

चंद्रकांत पाटील यांची शरद पवारांवर जोरदार टीका
जेव्हा शरद पवार यांनी छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांना शिवसेनेतून बाहेर काढले. त्यावेळी त्यांना ईडीची भीती दाखवली होती का? ईडीची भीती दाखवायला ही काय सामान्य माणसे आहेत का, असा सवाल पाटील यांनी केला. या सगळ्यांची कामे होत नव्हती. त्या पक्षात राहूनही मतदारसंघाची कामे होत नसतील, तर ते काय करणार?

Web Title: Sharad Pawar criticizes Chandrakant Patil, Sharad Pawar when he leaves Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.