Sharad Pawar: "मी वॉर्डातही येईन, मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविण्याची संधी"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 06:07 PM2022-07-13T18:07:40+5:302022-07-13T18:13:08+5:30

राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार यांनी आगामी महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारील लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत

Sharad Pawar: "I will also come to the ward, an opportunity to hoist the NCP flag in the Mumbai Municipal Corporation.", Says Sharad pawar to ncp worker | Sharad Pawar: "मी वॉर्डातही येईन, मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविण्याची संधी"

Sharad Pawar: "मी वॉर्डातही येईन, मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविण्याची संधी"

googlenewsNext

मुंबई - राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनात शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या राजकीय धक्कातंत्रामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची मोठी अडचण होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता 'मिशन मुंबई मनपा'साठी कामाला लागले आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय नेत्यांची बैठक घेतली. यावेळी, मी वॉर्डातही प्रचारासाठी येईन, असे विश्सास त्यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना दिला.  

राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार यांनी आगामी महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारील लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. तसंच महापालिका निवडणुकीसाठी आपल्यासोबत कुणी येवो न येवो याचा विचार करत बसू नका, तयारीला लागा असे स्पष्ट निर्देश शरद पवार यांनी पदाधिकारी आणि वॉर्ड अध्यक्षांना दिले आहेत. आतापासून दर २० दिवसांनी शरद पवार मुंबईतील परिस्थितीचा वॉर्ड अध्यक्षांकडून आढावा घेणार आहेत. तसंच कोणत्या वॉर्डात पक्षाचं प्राबल्य जास्त आहे असे वॉर्ड निश्चित करुन त्याचाही आढावा शरद पवार घेणार आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारातही ते उतरणार आहेत. 

मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. या निवडणुकीत वरिष्ठ नेते वेळ देतीलच, तसेच मी देखील वेळ देईन. मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी मला कुठल्या वॉर्डमध्ये न्यायचे हे ठरवावे, त्याठिकाणी यायला मी तयार आहे, असे पवार यांनी यावेळी म्हटले. कार्याध्यक्ष राखी जाधव आणि कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांना निवडणुकीचा आराखडा तयार करावा अशी माझी सूचना आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला आपला झेंडा फडकाविण्याची संधी आहे, असेही त्यांनी म्हटले. 

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे मुंबई मनपाची सत्ता राखण्याचं आव्हान यावेळी शिवसेनेसमोर असणार आहे. यातच महाविकास आघाडी मुंबई मनपाला एकत्रितरित्या सामोरं जाणार का? याबाबतही अद्याप कोणतीच स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना कुणी सोबत येतंय की नाही याची वाट पाहात बसू नका आणि प्रत्येक वॉर्डात तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहे. 
 

Web Title: Sharad Pawar: "I will also come to the ward, an opportunity to hoist the NCP flag in the Mumbai Municipal Corporation.", Says Sharad pawar to ncp worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.