'अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे हा पुरस्कार मिळतोय, हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे, यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. की ज्यांच्याहस्ते हा पुरस्कार मला मिळतोय, आदरणीय शरदराव पवार साहेब, माझ्या दृष्टीने हा माणूस फार मोठा आहे. आदरणीय असं कोणालाही मी लावत न नाही, ते माझे अत्यंत आवडते नेते आहेत. त्यांनी माझ एक काम मोजून तीन मिनिटात केलं',असं कौतुक अभिनेता अशोक सराफ यांनी केलं. आज नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण व कलावंत मेळाव्यात अशोक सराफ बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार शरद पवार यांचं कौतुक केलं. तसेच एक किस्साही सांगितला.
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
"शरद पवार अजुनही सगळ्या लोकांना नावासह ओळखतात. मी त्यांना आधी कधी भेटलो नव्हतो, जेव्हा मी भेटलो होतो तेव्हा ते हसले मग मी म्हणालो ते मला ओळखतात. परत एकदा ते माझ्याकडे बघून हसले. अशा कतृत्ववान माणसाकडून मला पुरस्कार मिळतो याच मला खूप छान वाटतं, असंही अभिनेते अशोक सराफ म्हणाले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ म्हणाले की, रांगेत चार मोठे पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र भूषण, संगीत कला अकादमी पुरस्कार आणि मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानंतर मिळालेला हा नाट्य परिषदेचा पुरस्कार खूप मोठा आहे. हा आनंद शब्दांत वर्णन करणणे कठीण आहे. पोलिसांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केले आहे. कुठेही अडकलो की सोडतात. पोलिसांना मी खूप जवळचा वाटतो असे म्हणत त्यांनी एक किस्सा सांगितला.
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नाटककार गो. ब. देवल स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने यशवंत नाट्यगृहाध्ये पुरस्कार वितरण, कलावंत मेळावा आणि यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल रसिकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार, तहहयात विश्वस्त शशी प्रभू, विश्वस्त उदय सामंत, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाटय संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल, विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने 'नाट्यकलेचा जागर'चे सादरीकरण करण्यात आले.