"फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात, शरद पवार ज्येष्ठ पण श्रेष्ठ नाहीत", पडळकरांचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 12:34 PM2022-03-11T12:34:35+5:302022-03-11T12:35:06+5:30

शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. पण श्रेष्ठ नाहीत. देवेंद्र फडणवीस हे असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात, अशी घणाघाती टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Sharad Pawar is senior but not superior says Gopichand Padalkar | "फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात, शरद पवार ज्येष्ठ पण श्रेष्ठ नाहीत", पडळकरांचं टीकास्त्र

"फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात, शरद पवार ज्येष्ठ पण श्रेष्ठ नाहीत", पडळकरांचं टीकास्त्र

Next

मुंबई-

शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. पण श्रेष्ठ नाहीत. देवेंद्र फडणवीस हे असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात, अशी घणाघाती टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते मुंबईत भाजपाच्या प्रदेशकार्यालया बाहेर आयोजित चार राज्यांच्या निवडणुकीतील यशाच्या सेलिब्रेशनवेळी बोलत होते. गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत मुंबईत भाजपाकडून करण्यात आलं. यावेळी पडळकरांनी फडणवीसांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना थेट शरद पवारांवर निशाणा साधला. 

"शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. पण श्रेष्ठ नाहीत. काही केलं तरी मीच केलं. माझ्यापेक्षा पुढे कुणी जाता कामा नये असे शरद पवार आहेत. देवेंद्रजी १०-२० पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे. फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा आणि राष्ट्राच्या विरोधातील भूमिका शरद पवारांकडे आहे असले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आहे", असं गोपीचंद पडळकर म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस राज्याला मिळालेलं 'गॉड गिफ्ट'
देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात फक्त महाराष्ट्राच्या हिताचा विचार असतो. त्यामुळे ते कालही नेते होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. त्यांच्याविरोधात कितीही षडयंत्र रचली गेली तरी गावखेड्यापासून ते शहरापर्यंत ते अगदी झोपडपट्टीतील माणसाला फडणवीसांचा स्पष्ट हेतू माहित आहे. त्यामुळे कपटनिती, विश्वासघातीनिती असं वाईट राजकारण फडणवीस करत नाहीत, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. 

"देवेंद्र फडणवीस हे परमेश्वरानं महाराष्ट्राला दिलेलं एक गिफ्ट आहे. ते एक गॉडगिफ्ट आपल्याला मिळालेलं आहे आणि ते तळहाताच्या फोडासारखं जपायचं हे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांनी ठरवलं आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हाही ते २० तास काम करत होते आणि विश्वासघातानं विरोधी पक्षात गेले तरी ते लोकांसाठी २० तास काम करत आहेत", असं गोपीचंद पडळकर म्हणाले. 

Web Title: Sharad Pawar is senior but not superior says Gopichand Padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.