Join us

Sharad Pawar : जयंत पाटलांच्या मुलाची पॅरीसवाली लव्हस्टोरी, चक्क शरद पवारांनीच सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 5:17 PM

Sharad Pawar : जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या राजवर्धन (Rajvardhan Patil) या धाकट्या मुलाचे प्रेमप्रकरण समोर आलं आहे.

ठळक मुद्देजयंतरावाच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केला. दोघांचं जुळलं, पण आमची पोरं काय करतील याचा नेम नाही. येथे सर्व सहकारी आहेत, त्यांना आनंदाची बातमी द्यायची आहे

मुंबई - राजकीय नेत्यांची मुले म्हटलं की अनेक बंधने असतात. बाहेर फिरताना आणि समाजात वावरतानाही विचारपूर्वक पाऊल टाकवं लागतं. कारण, राजकीय करिअर करण्यासाठी ही पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. त्यामुळे, कॉलेजनंतर लग्नाच्यावेळीही कुटुंबीयांचा मान-सन्मान राखून, मर्जी राखूनच त्यांची पावले पडतात. मात्र, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मुलाने भावी पत्नीला चक्क फिल्मीस्टाईल प्रपोज केला आहे. त्यामुळे, राजवर्धन पाटील यांच्या प्रेमाची चर्चा चक्क राष्ट्रवादीचे सर्वासर्वा शरद पवार यांच्या तोंडून ऐकायला मिळाली. 

जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या राजवर्धन (Rajvardhan Patil) या धाकट्या मुलाचे प्रेमप्रकरण समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनीच मुंबईतील पत्रकार परिषदेत राजवर्धन यांच्या प्रेमाचा आणि त्यांच्या अनोख्या पद्धतीने प्रपोजचा किस्सा सार्वजनिक केला आहे. राजवर्धन यांनी चक्क पॅरीसच्या आयफेल टॉवरवर जाऊन आपल्या प्रेयसीला प्रपोज केला आहे. याबाबत बोलताना, आता आमची पोरं काय करतील याचा नेम नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

पवारांनी सांगितला किस्सा

जयंतरावाच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केला. दोघांचं जुळलं, पण आमची पोरं काय करतील याचा नेम नाही. येथे सर्व सहकारी आहेत, त्यांना आनंदाची बातमी द्यायची आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे. आमचा सर्वांचा दृष्टीकोन किती व्यापक झाला आहे बघा. जयंत पाटलांच्या चिरंजीवांनी काल संध्याकाळी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केला. त्यास दोन्ही बाजूंनी मान्यता मिळवली. आता, आम्ही वाळवा, इस्लामपूरपर्यंत सीमित नाही आहोत. आम्ही एकदम पॅरिस वगैरे जातो. ठिकाणं इंटरनॅशनल असेल. पण दोघेही स्थानिकच आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, आता आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आमची मुलं कुठं जाऊन काय करतील हे सांगता येत नाही, असं मिश्कीलपणे शरद पवारांनी म्हणताच हशा पिकला.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसजयंत पाटीलदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टपॅरिस