"एक दिवस असा येईल की गुजरातला आर्थिक राजधानी घोषित करतील आणि मुंबई..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 08:49 PM2023-03-21T20:49:28+5:302023-03-21T20:50:21+5:30

राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे रोखठोक मत, अधोरेखित केला भविष्यातील धोका?

Sharad Pawar led NCP Maharashtra Chief Jayant Patil says he is Afraid that one day Gujarat will replace Mumbai as Financial Capital of India  | "एक दिवस असा येईल की गुजरातला आर्थिक राजधानी घोषित करतील आणि मुंबई..."

"एक दिवस असा येईल की गुजरातला आर्थिक राजधानी घोषित करतील आणि मुंबई..."

googlenewsNext

Jayant Patil in Maharashtra Budget Session: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी लाख म्हणोत की, महाविकास आघाडी सरकार असताना आमच्यावर अन्याय झाला, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच मुख्यमंत्र्यांनी या खात्याच्या माध्यमातून अनेकांचे 'कल्याण' केले. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार केंद्राच्या बोलण्याप्रमाणे वागत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण ज्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत, त्यानुसार एकेदिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल की काय, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

गुजरातला मुंबईविषयी आकस असणे स्वाभाविक आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही याचे त्यांना दुःख आहे असा टोला लगावतानाच या मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करले आहे. नगरविकास खात्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबई शहर आहे. अनेकांसाठी ही मुंबई पोट भरणारी आहे, अनेकांसाठी ती घर आहे, अनेकांसाठी ती लक्ष्मी आहे, अनेकांसाठी स्वप्न आहे तर अनेकांसाठी माय आहे. पण राज्यात सत्तांतर झाले आणि मुंबई खुल्या तिजोरीसारखी आपल्याला मिळाली, अशी भावना सत्ताधाऱ्यांच्या मनात जागृत झाली आहे असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला. 

मागील मुंबई मनपा निवडणुकीत साम - दाम - दंड - भेद या सर्व गोष्टींचा वापर करून शिवसेना मनपा निवडणुकीत चितपट करण्याचा डाव त्यांच्या मित्रांनी आखला होता. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण ज्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत, त्यानुसार एकेदिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल की काय अशी भीती जयंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. २९३च्या चर्चेवर बोलताना, त्यांनी हे विषय मांडले.

मुंबई महापालिकेकडे काही ठेवी आहेत. त्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे. १२ हजार कोटी रुपये महापालिकेच्या ठेवीमधून काढण्याची तरतूद महापालिकेच्या बजेटमध्ये करण्यात आली आणि पालिकेच्या तिजोरीवर  हात मारला गेला. मुंबई सुशोभीकरणाच्या नावाखाली तुम्ही ज्या गोष्टी चांगल्या होत्या त्याचीही तोडफोड करून नवी कामे सुरू केली. गरज नाही तिथे खर्च केला जात आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे या मुंबई शहरावर प्रचंड प्रेम होते. मुंबईची सत्ता भाजपच्या हातात देणे हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पटले नसते. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे काम होत आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जात आहे, असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला. 

तसेच, मागील २ वर्षांपासून मुंबईसह बऱ्याच महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका का होत नाही याचा अभ्यास करायला हवा असेही जयंत पाटील म्हणाले.

Web Title: Sharad Pawar led NCP Maharashtra Chief Jayant Patil says he is Afraid that one day Gujarat will replace Mumbai as Financial Capital of India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.