....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 02:22 PM2020-05-26T14:22:49+5:302020-05-26T14:24:44+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र काम करत सरकार चांगलं चालवत आहेत, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यापाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अचानक भेट घेतल्यानंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचीही चर्चा आहे. पण खुद्द शरद पवारांनीच त्याचं खंडन केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र काम करत सरकार चांगलं चालवत आहेत, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
या सर्व घडामोडींवर शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या महारोगराईतून महाराष्ट्राला बाहेर कसं काढायचं यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. तिन्ही पक्षांची भूमिका याबाबतीत एकच आहे,' असा खुलासाही पवारांनी केला आहे. काल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटलो, राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा मी आढावा घेतला. रुग्णांची संख्या, आरोग्य सुविधांबरोबरच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात चर्चा झाली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मला दोन वेळा चहाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळं काल त्यांना भेटायला गेलो. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या सातत्यानं संपर्कात आहेत. काँग्रेसमध्ये एखाद्या नेत्यानं मत व्यक्त केलं असल्यास ते त्याचं वैयक्तिक मत असू शकतं. त्याचा सरकारशी काडीमात्र संबंध नाही. राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. पण तशी दिल्लीत किंवा मुंबईत कुठेही चर्चा नसल्याचंही काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा
ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?
CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना
CoronaVirus News: “खोदा पहाड और...."; मोदींच्या पॅकेजमधून घोर निराशा- पृथ्वीराज चव्हाण
Curfew Extend: 'या' राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू
देशातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, योगी अन् नितीश; राहुल, रामदेव पिछाडीवर