मुंबई - राज्यात आणि देशात गेल्या काही दिवसांपासून धार्मिक तेढ निर्माण करणारं वातावरण तयार करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. जय श्रीराम, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्याच्या विषयावरुन वाद निर्माण केले जात आहेत. राज्यात आणि देशातील हे वातावरण सामाजिक सलोखा आणि ऐक्य बिघडवून टाकणारे आहे. त्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राजधानी दिल्लीत राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासंदर्भात स्वत: राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रात मनसेनं मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तर, दिल्ली अन् उत्तर प्रदेशातील काही भागात श्रीराम मिरवणुकीवरुन धार्मिक तेढ निर्माण झाले होते. एकंदरीत सोशल मीडियातूनही अनकेदा काही गट-तट धार्मिक भावना भडकवणारे विधान करतात. त्यासंदर्भातील व्हिडिओही शेअर केले जातात. त्यामुळे, देशातील, राज्यातील, गावांतील गुण्या-गोविंदाने नांदणाऱ्या सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होतो. त्यासाठी, राष्ट्रवादीने एक पाऊल पुढे टाकलं आहे.
दरम्यान, यावेळी शरद पवार यांना निवेदन पत्रिका देण्यात आली आहे. त्यामध्ये, युवा अधिकार कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी हे निवदेन.. असा विषय लिहिला आहे.