Sharad Pawar, Hanuman Chalisa: "हनुमानाच्या नावाने हे करणार, ते करणार... याने बेकारी अन् भुकेचा प्रश्न सुटणार आहे का?"; शरद पवार यांचा मंचावरून थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 04:21 PM2022-04-30T16:21:08+5:302022-04-30T16:21:46+5:30

शाहू-फुले-आंबेडकराचं नाव घ्यायचं नसेल तर मग कुणाचं नाव घ्यायचं? - शरद पवार

Sharad Pawar Questions people like MNS chief Raj Thackeray that will poverty Unemployment end by just taking Lord Hanuman name or Reading Hanuman Chalisa | Sharad Pawar, Hanuman Chalisa: "हनुमानाच्या नावाने हे करणार, ते करणार... याने बेकारी अन् भुकेचा प्रश्न सुटणार आहे का?"; शरद पवार यांचा मंचावरून थेट सवाल

Sharad Pawar, Hanuman Chalisa: "हनुमानाच्या नावाने हे करणार, ते करणार... याने बेकारी अन् भुकेचा प्रश्न सुटणार आहे का?"; शरद पवार यांचा मंचावरून थेट सवाल

Next

Sharad Pawar, Hanuman Chalisa: "गेले काही जात, धर्म यांच्या नावाने पुन्हा एकदा देशाला मागे नेण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय. लोकांचे मुलभूत प्रश्न हे महागाई, अन्नधान्य आणि रोजगारी हे आहेत. या प्रश्नांकडे कुणाचं लक्ष नाही. सर्व समाजाला मुख्य प्रश्नापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न होतोय. हे करणार ते करणार... हनुमानाच्या नावाने करणार... आणखी कुणाच्या नावाने करणार... या सगळ्या चर्चा, मागण्या याने बेकारीचा आणि भुकेचा प्रश्न सुटणार आहे का?", असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्यावतीने कृतज्ञता गौरव सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजपाचे (BJP) राज्यातील बडे नेते हनुमान चालिसा मुद्द्यावर ठाम आहेत. त्याला उद्देशून शरद पवार यांनी हे विधान केले.

"काही लोक भलत्याच मागण्या करताना दिसत आहेत. त्यामुळे आपण संभ्रमात पडतो. या सगळ्या गोष्टीला उत्तर देण्याची भूमिका घ्यायची असेल तर शाहू - फुले - आंबेडकरांचा विचार हाच ख-या अर्थाने आपल्याला दृष्टी आणि शक्ती देणारा आहे. सध्या सर्व समाजाला मुख्य प्रश्नापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न होतोय. सभेत कुणी म्हणतं हे करणार ते करणार... हनुमानाच्या नावाने करणार... अशाने बेकारीचा आणि भुकेचा प्रश्न सुटणार आहे का? तुमच्यावर पिढ्यानपिढ्या होणारा अन्याय सुटणार आहे का?" असा प्रश्न त्यांनी विचारला.

मूळ प्रश्नांना बगल देऊन भलत्याच गोष्टींकडे समाजाला वळवून स्वतःचा स्वार्थ साधत काही घटकांनी निकाल घेतला आणि त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळते हे खेदजनक आहे. शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो म्हणून एका नेत्याने माझ्यावर टीका केली. मग नावं कुणाची घ्यायची? आज श्रीलंकेत दंगा सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांना जावं लागलं, मात्र हिंदुस्थान एवढा मोठा देश आहे. अनेक भाषा, अनेक जाती आहेत. त्यामुळे हा एकसंघ राहिला याचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे", असे त्यांनी नमूद केले.

"शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी आपण काम करत राहिले पाहिजे. संघटनेने या सर्व घटकांना त्या दिशेने न्यायचे आहे. हे काम केलेत तर लवकर आपली नवी पिढीही शिक्षित होईल, समृध्द होईल. न्यायासाठी प्रसंगी संघर्ष करेल व आपले मुलभूत अधिकार आपल्या पदरात पाडून घेऊन जीवनमान बदलेल. तसा प्रयत्न करण्याची सर्वांची जबाबदारी आहे" असेही शरद पवार म्हणाले.

Web Title: Sharad Pawar Questions people like MNS chief Raj Thackeray that will poverty Unemployment end by just taking Lord Hanuman name or Reading Hanuman Chalisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.