राजू शेट्टींच्या इशाऱ्यावर शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर, फक्त एवढचं म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 06:49 AM2021-09-05T06:49:27+5:302021-09-05T06:50:54+5:30

शरद पवार : दिलेला शब्द आम्ही पाळला

Sharad Pawar responds to Raju Shetty's hint | राजू शेट्टींच्या इशाऱ्यावर शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर, फक्त एवढचं म्हणाले...

राजू शेट्टींच्या इशाऱ्यावर शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर, फक्त एवढचं म्हणाले...

Next
ठळक मुद्देपवार म्हणाले की ‘राष्ट्रवादी’कडून जी यादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्यपालांना दिली. त्यात त्यांचे नाव आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ‘राष्ट्रवादी’च्या वतीने जी यादी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिली त्यात सहकार, शेतीच्या क्षेत्रात शेट्टींनी जे योगदान दिले ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावे असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणानं केलं आहे,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महाआघाडी सरकारने विधान परिषदेवरील बारा सदस्यांच्या निवडीसाठीची बारा जणांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिली आहे. मात्र, तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शेट्टी यांनीही नाराजी व्यक्त केली. मात्र, शेट्टी यांचे नाव वगळले नसल्याचे स्पष्ट करत शरद पवार यांनी या वादंगाला पूर्णविराम दिला.

पवार म्हणाले की ‘राष्ट्रवादी’कडून जी यादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्यपालांना दिली. त्यात त्यांचे नाव आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतो आहोत. शेट्टी नाराज आहेत का, हे मला माहिती नाही. त्यांनी कोणती भूमिका घेतली असेल, तर त्याबद्दल मला कल्पना नाही, असेही पवार म्हणाले.

विरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा गैरवापर
महाराष्ट्रातच नव्हे, तर पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांतही ईडीचा गैरवापर सुरू आहे. या माध्यमातून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे. ईडीचा असा गैरवापर यापूर्वी कधीही झाला नव्हता.
 

Web Title: Sharad Pawar responds to Raju Shetty's hint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.