देवेंद्र फडणवीसांच्या 'गौप्यस्फोटा'वर शरद पवारांनी केला खुलासा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 01:45 PM2020-06-27T13:45:40+5:302020-06-27T13:50:16+5:30
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला
सातारा : राष्ट्रवादी काँग्रसेचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा दौऱ्यावर आल होते. त्यावेळी, भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तर, पडळकर यांच्यावर शेलक्या शद्बात टीका केली. त्यासोबतच, देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीने यावर राज्यभर आंदोलने केली. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे. मला नाही वाटत त्याला काही महत्व द्यावे. लोकसभेला, विधानसभेला ज्या व्यक्तीचे डिपॉझिट जप्त झाले त्या बद्दल काय बोलणार. त्याला लोकांनीच त्या त्या वेळेला बाजुला केले आहे. त्याची नोंद का घ्यावी, सोडून द्या, अशी शेलक्या शब्दांतील टीका शरद पवार यांनी केली. तर, देवेंद्र फडणवीस हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात, असे म्हणत फडणवीसांना टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत गौप्यस्फोट करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या सत्तास्थापनेबद्दल माहिती दिली. दोन वर्षापूर्वी एक स्थिती अशी होती की राष्ट्रवादी आणि भाजप सोबत यायचं असा निर्णय झाला, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच राष्ट्रवादी आणि भाजप जर सोबत येणार असेल तर शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं. जर एकत्र जायचं असेल आणि काँग्रेसला बाजूला ठेवायचं असेल तर शिवसेना आम्हाला सोबत लागेल. शिवसेनेशिवाय आम्ही तुम्हाला घेत नाही, असा निरोप गृहमंत्री अमित शाहांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिला होता, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याबाबत बोलताना शरद पवार यांनी फडवीस हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात, असे म्हटले. दरम्यान, जयंत पाटील यांनीही फडणवीसांच्या वक्तव्यात तथ्य नसल्याचे म्हटले होते.
दरम्यान, भारत-चीन सीमारेषेवरील घडामोडींबाबतही पवार यांनी आपलं मत व्यक्त केलंय. चीनसोबत युद्ध होणार नाही असे म्हणणे योग्य नाही. चीनने कुरापत काढली. सियाचिनच्या आपल्या भागात जाण्यासाठी हा रस्ता केलेला आहे. हा रस्ता भारतीयांसाठी आहे. असे असताना चीनचे सैन्य त्या रस्त्यावर येते. तेव्हा आपल्या जवानांनी त्यांना अडविले. झटापट झाली. 1993 साली संरक्षण मंत्री असताना चीनमध्ये गेलो होतो. तेव्हा हिमायलीन सीमेवर सैन्य़ कमी करण्याची चर्चा केली होती. नरसिंहराव यांनी चीनसोबत करार केला. यामध्ये दोन्ही बाजुने गोळीबार होणार नाही असा शब्द देण्यात आला. यामुळे चीनच्या बाजुने शारिरिक इजा करण्याचा प्रयत्न झाला. भारतीय जवान गस्त घालत होते, असे शरद पवार यांनी सांगितले.
चीनने काही भाग बळकावला आहे हे खरे आहे. चीनच्या युद्धानंतर चीनने हजारो किमी भूभाग ताब्यात ठेवलेला आहे. ती अजून काय सोडलेली नाही. आजच्या परिस्थितीबाबत माहिती नाही. आरोप करतो तेव्हा, आपण असताना काय घडले होते तेही पाहिले पाहिजे. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. यावर राजकारण करू नये असे माझे मत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. राहुल गांधी केंद्र सरकारवर टीका करतात या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.
आणखी वाचा
शेकडो वर्षांची कुटुंबाची परंपरा राखणारा वारकरी..; ऐसे असावे सख्यत्व! विवेक धरावे सत्व!!
पडळकरांचे दोनदा डिपॉझिट गेलेय, काय महत्व द्यायचे? शरद पवारांनी शेलक्या शब्दांत फटकारले
Video : पहिलीचं पोरगं चालवतंय जेसीबी, व्हिडिओ शेअर करत सेहवागनं केलं कौतुक