पवार म्हणाले, चेहरा नंतर ठरवू, आधी एकत्र येऊ; नितीश कुमार, तेजस्वी यादव यांनी घेतली पवार, ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 05:35 AM2023-05-12T05:35:30+5:302023-05-12T05:36:19+5:30

देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे आहे.

Sharad Pawar said, let's decide the face later, come together first; Nitish Kumar, Tejashwi Yadav met Pawar, Thackeray | पवार म्हणाले, चेहरा नंतर ठरवू, आधी एकत्र येऊ; नितीश कुमार, तेजस्वी यादव यांनी घेतली पवार, ठाकरेंची भेट

पवार म्हणाले, चेहरा नंतर ठरवू, आधी एकत्र येऊ; नितीश कुमार, तेजस्वी यादव यांनी घेतली पवार, ठाकरेंची भेट

googlenewsNext

मुंबई : देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. सगळे मिळून काम करणे हे जास्त महत्त्वाचे असून आम्ही एकत्र काम करू, चेहरा नंतर ठरवला जाईल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना माडंली.

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. या भेटीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. त्यापूर्वी मातोश्रीवर जाऊन नितीश कुमार यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली. 

राज्यपालांची निवड करताना जी काळजी घ्यावी लागते ती काळजी न घेता जाणीवपूर्वक तिथल्या स्थानिक अन्य राष्ट्रीय विचारांचे लोकप्रतिनिधींना किंवा संस्थेला त्रास कसा होईल, ही भूमिका घेऊन या नियुक्त्या केल्यानंतर हे घडत आहे. त्याचेच उदाहरण आपण महाराष्ट्रात पाहिले, अशी टीकाही पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केली. कोर्टाच्या निकालानंतर भाजपविरोधात प्रचार करणे सोपे होणार आहे, असे सांगतानाच ज्यांच्या नावाने निवडून येता त्या पक्षाचा आदेश महत्त्वाचा असतो. काही निर्णय अजून व्हायचे आहेत. त्यामुळे नैतिकता आणि भाजपचा काही संबंध आहे, असे वाटत नाही असा उपरोधिक टोलाही पवार यांनी लगावला.

लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र - उद्धव ठाकरे

देशात लोकशाहीची हत्या होते की काय, असे चित्र दिसते आहे. लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाहीची हत्या करू इच्छितात त्यांच्या विरोधात देशप्रेमी पक्ष आणि जनता एकत्र करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. ते अधिक बळकट करण्यासाठी नितीश कुमार यांनी भेट घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

देश हितासाठी एकत्र येतोय - नितीश कुमार 

पूर्ण देशात जास्तीत जास्त पक्ष एकत्र यावेत, असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज जे केंद्रात आहेत ते इतिहास बदलत आहेत. देश हितासाठी, विकासासाठी, देशात सर्व धर्मात एकता राहिली पाहिजे, यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे नितीश कुमार यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: Sharad Pawar said, let's decide the face later, come together first; Nitish Kumar, Tejashwi Yadav met Pawar, Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.