Join us

शरद पवारांचा मिलिंद नार्वेकरांना कानमंत्र; राजकीय चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 3:23 PM

कारमध्ये बसण्यापूर्वी पवारांनी अचानक उद्धव ठाकरे यांचे विश्वासू  मिलिंद नार्वेकर यांना जवळ बोलावून घेतले.

मुंबई: एकीकडे राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत असतानाच रविवारी आणखी एका घटनेने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. शिवाजी मंदिरमध्ये रविवारी शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिवाजी मंदिरच्या मागील बाजूस असलेल्या पार्किंगमध्ये शरद पवार त्यांच्या कारमध्ये निघण्यासाठी बसले. परंतु कारमध्ये बसण्यापूर्वी पवारांनी अचानक उद्धव ठाकरे यांचे विश्वासू  मिलिंद नार्वेकर यांना जवळ बोलावून घेतले. यानंतर पवारांनी त्यांच्या कानात काहीतरी सांगितले.सर्व पक्षांशी चांगले संबंध असलेले नेते म्हणून मिलिंद नार्वेकर ओळखले जातात. परंतु, सध्या राज्यात भाजपाविरोधी आघाडी उभी करण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पवारांचा हा कानमंत्र सूचक ठरू शकतो. त्यामुळे पवारांच्या या कृतीने उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवार आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी, याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

टॅग्स :शरद पवारशिवसेनाउद्धव ठाकरे