Join us

Sharad Pawar : 'शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 4:24 PM

Sharad Pawar : भाजपला शेतीतला काही कळत नाही, शेतीशी यांचा संबंध नाही, असे म्हणत सरकारने यांची मतं घेतली. जर, पवार मोदींचीच भाषा बोलणार असतील तर अवघड आहे.

ठळक मुद्देकृषीमूल्य आयोग दरवर्षी एफआरपी जाहीर करत असते, मग याचवेळी एफआरपीसोबत एक नोट का दिली, की तीन तुकड्यांमध्ये एफआरपी द्यावी, याची जबाबदारी केंद्र सरकार का घेत नाहीत, असे म्हणत सर्वच राजकीय पक्ष एक असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले.

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या एफआरपी दरावरुन खासदार शरद पवार यांच्यावर प्रहार केला आहे. मी आज कोणासोबतही, मी केवळ शेतकऱ्यांच्याजवळ आहे. योग्य वेळ येताच मी माझी भूमिका स्पष्ट करेल असे म्हणत शेतकऱ्यांच्या एफआरपी आणि एफआरपीच्या तीन तुकड्यांबद्दलच्या मुद्द्यांवरु शरद पवार यांना लक्ष्य केले. आम्ही शरद पवारांचे गुलाम नाही, असे स्पष्टपणे त्यांनी म्हटलं. 

भाजपला शेतीतला काही कळत नाही, शेतीशी यांचा संबंध नाही, असे म्हणत सरकारने यांची मतं घेतली. जर, पवार मोदींचीच भाषा बोलणार असतील तर अवघड आहे. एफआरपीचे तुकडे करायच्या मुद्दयावर यांनी केंद्र सरकारच्या हो ला हो मिळवला. एफआरपीचे तुकडे शरद पवार पडू देणार नाहीत, असे म्हणतात. केंद्र सरकारच्या रमेशचंद्र समितीनेच तीन तुकड्यातील एफआरपीचा प्रस्ताव का दिला, असा प्रश्न राजू शेट्टी यांनी विचारला आहे. 

कृषीमूल्य आयोग दरवर्षी एफआरपी जाहीर करत असते, मग याचवेळी एफआरपीसोबत एक नोट का दिली, की तीन तुकड्यांमध्ये एफआरपी द्यावी, याची जबाबदारी केंद्र सरकार का घेत नाहीत, असे म्हणत सर्वच राजकीय पक्ष एक असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले. शरद पवार हे कारखानदारांच्याच बाजुने आहेत, पवारांनी असं व्हायला पाहिजे, असे म्हटल्यास, आम्हीही तसेच म्हणावे असे थोडीच आहे. आम्ही काय त्यांचे गुलाम आहोत का? असे म्हणत राजू शेट्टींनी शरद पवार यांच्या भूमिकेला आपलं समर्थन नसल्याचं स्पष्ट केलं. शेट्टींनी एबीपी माझाशी बोलताना आपली भूमिका मांडली. 

दरम्यान, पवार हे यापूर्वीही कारखानदारांचे होते, आजही आहेत. पण, केंद्र सरकारने ही कळ काढलीच का?, असा प्रश्नही शेट्टी यांनी विचारला.  

टॅग्स :राजू शेट्टीराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारशेतकरीसाखर कारखाने