Sharad Pawar : लढाई जिंकली, शरद पवारांना रुग्णालयातून आजच डिस्चार्ज मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 02:29 PM2021-04-03T14:29:22+5:302021-04-03T14:31:30+5:30
Sharad Pawar : शरद पवार यांना मंगळवारी अचानक पोटात दुखू लागले म्हणून त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या सीबीडी (कॉमन बाईल डक्ट) पित्ताशयाला जोडणाऱ्या नळीमध्ये एक खडा आढळला.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या पित्तनलिकेतील खडा एण्डोस्कोपीच्या साहाय्याने काढण्यात आला असून, त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. एण्डोस्कोपी करण्याचा निर्णय वेळीच घेतला गेला नसता तर स्वादुपिंडावर परिणाम झाला असता, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ. प्रतित समदानी यांनी ‘लोकमत’ला दिली. आता शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून आजच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. (The stone in Sharad Pawar's bile duct was removed with the help of endoscopy. Pratit Samdani informed Lokmat)
शरद पवार यांना मंगळवारी अचानक पोटात दुखू लागले म्हणून त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या सीबीडी (कॉमन बाईल डक्ट) पित्ताशयाला जोडणाऱ्या नळीमध्ये एक खडा आढळला. त्यामुळे बुधवारी पहाटे एंडोस्कोपीच्या साहाय्याने तो खडा दूर करण्यात आला. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमकडून आज सकाळीच त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून आजच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. मात्र, त्यांना पुढील 7 दिवस घरीच आराम करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, 15 दिवसांनी त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर पित्ताशयासंबंधी पुढील शस्त्रक्रिया करण्यात येईल, असेही मलिक यांनी सांगितले आहे. तसेच, कार्यकत्यांनी आणि हितचिंतकांनी पवार यांना भेटण्यासाठी गर्दी करू नये, अशी विनंतीही त्यांनी केलीय.
Update
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 3, 2021
Sharad Pawar saheb was checked upon by a team of Doctors today and his health is stable, he will be discharged from hospital today
He has been advised rest for 7 days and after 15 days if all his health parameters are stable, surgery on his Gall Bladder will be performed
उपचारावेळी दिग्गज नेते रुग्णालयात
खासदार पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या टीममध्ये डॉ. प्रतित समदानी, डॉ. सुलतान प्रधान तसेच डॉ. शहारुख गोलवाला, डॉ दप्तरी, डॉ. टिबडिवाला यांचा समावेश आहे. रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह नातेवाईक आणि अन्य नेते उपस्थित होते. खा. पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगत उपचार करणाऱ्याा डॉक्टरांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले.
आदरणीय @PawarSpeaks साहेबांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांच्या भेटीस जाण्याचे टाळावे, असे आवाहन ना. @nawabmalikncp यांनी केले आहे. https://t.co/G5rPbAtnp7
— NCP (@NCPspeaks) April 3, 2021
शरद पवार यांना नेमका काय त्रास होता?
पवारसाहेबांच्या पित्ताशयात खडे झाले आहेत. ज्याला गॉल स्टोन म्हणतात. मध्यंतरी पोटात दुखू लागले म्हणून ते उपचारासाठी आले होते. तपासणीअंती पित्ताशयात खडे आढळून आले. शिवाय, त्यांना रक्त पातळ होण्याचे औषध दिले जात होते. ते औषध सुरू असताना ऑपरेशन करणे शक्य नव्हते. त्यामुळे ते औषध थांबवून दोन-तीन दिवसांनी ऑपरेशन करू असे ठरले होते. मात्र, त्यातील एक खडा पित्तनलिकेत अडकल्यामुळे त्यांना वेदना वाढल्या. कॉमन बोईल डक्टमधील खडा काढणे गरजेचे होते. त्यामुळे एण्डोस्कोपी करावी लागली.