Sharad Pawar simplicity Viral Photo: शरद पवारांचा साधेपणा! Mumbai विमानतळावर सर्वसामान्यांसह उभे राहिले रांगेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 01:53 PM2022-03-29T13:53:38+5:302022-03-29T13:54:32+5:30
शरद पवारांचा हा फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होतोय
Sharad Pawar Simplicity Viral Photo: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर सध्या विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. भाजप विरूद्ध मविआ असा सामनाच राज्यात रंगल्याचं दिसून येतंय. पण साऱ्या गोंधळामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकीय नव्हे तर एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहेत. शरद पवार हे यांचा साधेपणा आणि सामाजिक जाणिव याचा प्रत्यत राजकीय नेतेमंडळींसह सामान्यांना बरेचदा आला असेल. राजकारणाच्या क्षेत्रातील मंडळींना VIP ट्रीटमेंट मिळावी म्हणून अनेकदा विमानांची उड्डाणे थांबवण्याच्या बातम्या बऱ्याच वेळा ऐकायला मिळाल्या आहेत. पण सर्वच राजकारणी असे नसतात. अनेक राजकारणी अनेक वर्षे राजकारण करूनही आणि पद, प्रतिष्ठा असूनही आपल्यातील साधेपणा जपतात. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार यांचा नुकताच व्हायरल झालेला फोटो.
शरद पवार हे राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणातील मोठं नाव. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांच्या राजकीय अनुभव व शैलीचं कौतुक केलं आहे. पण या साऱ्याचा अंहकार न बाळगता आपल्यातील साधेपणा शरद पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिला. शरद पवार या वयातही राज्यभर दौरे करत असतात आणि गावोगावी फिरून जनसामान्यांशी चर्चा करताना पाहायला मिळतात. राजकीय किंवा वैयक्तिक कामानिमित्त ते राज्यात, देशात आणि परदेशातही जात येत असतात. याच दरम्यान मुंबईच्याविमानतळावर आज शरद पवार VIP संस्कृती बाजूला ठेवून सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहिल्याचं दिसून आलं.
शरद पवार यांचं वय खूप आहे. तशातच ते कॅन्सरसारख्या मोठ्या आजारातून सावरले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण सर्व संकटांना ते धैर्याने सामोरं गेल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच मुंबईविमानतळावरचं आजचं चित्र पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. व्हीआयपी असल्याचा नियमानुसार लाभ शरद पवार यांना सहज घेता आला असता. पण त्यांना सामान्यांप्रमाणे रांगेत उभं राहूनच विमानात प्रवेश केला. आज सकाळी यूके ९७० हे मुंबई ते दिल्ली विमान निघाले. या विमानाच्या उड्डाणावेळी पॅसेंजर्स बोर्डिंगच्या वेळी शरद पवारांचा साधेपणा अनेकांना पाहायला मिळाला.