Sharad Pawar Covid Vaccine : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींपाठोपाठ शरद पवारांनीही टोचून घेतली कोरोनाची लस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 03:06 PM2021-03-01T15:06:01+5:302021-03-01T15:06:49+5:30
Sharad Pawar takes covid vaccine in mumbai j j hospital : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुंबईत जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस (Corona Vaccine) टोचून घेतली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुंबईत जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस (Corona Vaccine) टोचून घेतली आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या कन्या आण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तसेच जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने देखील पवारांसोबत उपस्थित आहेत. (ncp chief sharad pawar takes covid vaccine in mumbai j.j.hospital)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना लस; ट्विटद्वारे जनतेला आवाहन करत म्हणाले…
देशभरात आजपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस टोचून घेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत आज सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लस टोचून घेतली. त्यानंतर आता शरद पवार यांनीही पुढाकार घेऊन मुंबईत जे.जे.रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी उपस्थिती लावली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पवार यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर पवारांना 'सीरम'ची 'कोव्हिशिल्ड' लस टोचण्यात आली.
कोरोनाची लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले नेते
कोरोना प्रतिबंधक लस घेणारे शरद पवार हे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून ६० वर्षांवरील आणि गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या ४५ वर्षांवरील वयोगटातील लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे.