Sharad Pawar: शरद पवारांचा राजकीय उदय झाला तो दिवस, खासदार कन्येनं जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 10:06 AM2022-02-23T10:06:20+5:302022-02-23T10:09:38+5:30

Sharad Pawar: शरद पवार यांच्या लोक माझे सांगाता या पुस्तकातून त्यांनी आपला जीवनप्रवास आणि राजकीय प्रवासाची गाथाच मांडली आहे. राज्यासह देशाच्या राजकारणात त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली.

Sharad Pawar: The day Sharad Pawar's political rise, memories awakened by MP supriya sule | Sharad Pawar: शरद पवारांचा राजकीय उदय झाला तो दिवस, खासदार कन्येनं जागवल्या आठवणी

Sharad Pawar: शरद पवारांचा राजकीय उदय झाला तो दिवस, खासदार कन्येनं जागवल्या आठवणी

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणाचा चालता-बोलता संदर्भग्रंथ म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदारशरद पवार हे होय. कारण, गेल्या 55 वर्षांपासून ते राजकारणात सक्रीय असून वयाच्या 27 व्या वर्षी ते सर्वप्रथम आमदार झाले होते. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संसदीय राजकारणाला 54 वर्षे पूर्ण झाली आहेत. 22 फेब्रुवारी 1967 रोजी शरद पवारांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ (sharad pawar first oath ) घेतली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत शरद पवार सलग कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री बनूनही त्यांनी कारभार सांभाळला आहे. 

शरद पवार यांच्या लोक माझे सांगाता या पुस्तकातून त्यांनी आपला जीवनप्रवास आणि राजकीय प्रवासाची गाथाच मांडली आहे. राज्यासह देशाच्या राजकारणात त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली. शरद पवार हे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्याशिवाय त्यांनी देशाचे सरंक्षणमंत्रीपद सांभाळलं, मनमोहन सिंह सरकारमध्ये ते कृषीमंत्री होते. यांसह विविध संस्था आणि संघटनांचे ते अध्यक्ष राहिले आहेत. बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्षपद भूषविणारे ते पहिले राजकीय नेते ठरले आहेत. त्यामुळेच, त्यांच्या उल्लेख करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही त्यांना गुरू म्हणतात. शरद पवार आमदार बनलेल्या पहिल्या दिवसाची आठवण शेअर करत त्यांची कन्या खासदारसुप्रिया सुळे यांनी आठवणी जागवल्या आहेत. 

 

महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर शरद पवार यांचा उदय झाला तो हा दिवस... बरोबर ५५ वर्षांपूर्वी ते विधानसभेत निवडून गेले होते. संसदीय कामकाजात सक्रियतेची या ५५ वर्षात त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी विविध पदे भुषविली. यासह लोककल्याणकारी निर्णय घेऊन ते आग्रहाने राबविले देखील. या कार्यकाळात संसदीय प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावल्या. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखविलेल्या मार्गावर ते आजही अविरतपणे चालत आहेत. त्यांची ही वाटचाल आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. आदरणीय पवार साहेबांना संसदिय कारकीर्दीची ५५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यासोबत, संसद परिसरातील त्यांच्यासमवेतचा एक फोटोही शेअर केला आहे. 
 

Web Title: Sharad Pawar: The day Sharad Pawar's political rise, memories awakened by MP supriya sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.