Join us  

Sharad Pawar: फोटोला फोटोनेच उत्तर, राष्ट्रवादीने संदीप देशपांडेचा 'तो' फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 1:00 PM

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आक्रमकपणे विरोध केला.

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपला पूर्वनियोजित अयोध्या दौरा रद्द केला. केवळ प्रकृतीचे कारण नाही, तर हा एक सापळा असून, महाराष्ट्रातूनच त्याला रसद पुरविली जात असल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द करण्याची कारणे विषद केली. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. तर, मनसेकडून शरद पवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांचा एक फोटो शेअर करण्यात आला.  

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आक्रमकपणे विरोध केला. पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द करण्याची कारणांसह टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला. यानंतर आता मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी आपल्या ट्विटरवरून एक फोटो शेअर केला. या फोटोची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. मनसेच्या संदीप देशपांडे यांनीही हा फोटो शेअर करत कॅप्शन दिले. ''तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांविरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे'', अशी टीक संदीप देशपांडे यांनी केली. आता, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संदीप देशपांडे यांचा शरद पवारांसमवेतचा फोटो शेअर करत मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे. 

माहिम मतदारसंघामधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढविल्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांच्या कार्यपद्धतीने आपण प्रभावित झालो असून आपल्याला त्यांची भेट घेण्याची इच्छा असल्याचं देशपांडे यांनी यावेळी म्हटले होते. विशेष म्हणजे, त्यांनी ट्विटरवरुन हा फोटो शेअर करत, शरद पवार यांना भेटून शुभेच्छा दिल्या, असेही सांगितले होते. आता, राष्ट्रवादीकडून त्यांचं हे ट्विट आणि जुना फोटो शेअर करुन मनसेच्या फोटोलो फोटोनेच प्रत्युत्तर दिलं जात आहे. 

दरम्यान, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडवा विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे एका कार्यक्रमानिमित्त (Sharad Pawar) एकत्र बसल्याचे या फोटोत दिसत आहे. त्यामुळे, आता राष्ट्रवादीकडूनही तेल लावलेल्या पैलवानासोबत दादरचा काडी पैलवान... असे म्हणत संदीप देशपांडे यांचा शरद पवारांसमवेतचा फोटो शेअर सोशल मीडियातून शेअर करण्यात आला आहे. तर,  काही राष्ट्रवादी समर्थकांनी मनसे नेत्यांच्या ट्विटला उत्तर देतानाही हा फोटो शेअर केला आहे. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसंदीप देशपांडे