Join us

शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात; दक्षिण मुंबईच्या काही परिसरात जमावबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 6:37 AM

सुरक्षेच्या कारणास्तव कलम १४४ लागू

मुंबई : राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून नाव दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:हून ईडी कार्यालयात हजर राहून आपल्यावरील आरोपाचा खुलासा करण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाजवळ सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी १४४ कलमान्वये जमावबंदी लागू केली आहे.

टॅग्स :शरद पवारअंमलबजावणी संचालनालय