शरद पवार आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 05:16 AM2020-06-09T05:16:46+5:302020-06-09T05:17:14+5:30
१० जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.
मुंबई : ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. ९ जूनला रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
९ जून रोजी सकाळी ११. ३० वाजता माणगाव, १२.३० वाजता म्हसळा, १ वाजता दिवेआगार, २ वाजता श्रीवर्धन, ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक, सायंकाळी हरिहरेश्वर आणि नंतर दापोलीकडे रवाना होणार आहेत. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत.
१० जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.