'धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास शरद पवारांचा विरोध होता'; 'या' नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 02:48 PM2023-08-04T14:48:23+5:302023-08-04T14:55:31+5:30
अजित पवार यांच्यासह आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
मुंबई- गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांच्यासह आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. खासदार शरद पवार यांनीही गोपीनाथ मुंड यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना फोडून आपल्या पक्षात घेतल्याची चर्चा सुरू होती. यावर आता माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण देत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमदार धनंजय मुंडे यांना घेण्यास खासदार शरद पवार यांचा विरोध होता, असा गौप्यस्फोट माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका मुलाखतीत केला आहे.
जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण सरकारला भिडले; अजित पवारांच्या उत्तराने सर्वच हसले
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, धनंजय मुंडे भाजप पक्ष सोडणार हे एक वर्ष सुरू होतं. शरद पवार यांनी पंडित अण्णा मुंडे यांना तीन वेळा हे करायला नको म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांनाही फोन करुन हे सांगितलं होतं. शेवटी त्यांनी सांगितलं तुम्ही घेणार आहेत का नाही बघा नाहीतर आम्ही दुसऱ्या पक्षात जातो, त्यावेळी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला.
'त्यावेळी शरद पवार यांचे मत घर तोडू नका असं होतं, पण त्यांनी पवार साहेबांचं ऐकलं नाही, असंही आव्हाड म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार शरद पवार यांनीही याअगोदर राजकीय नेत्यांच्या घरात फूट पाडल्याचा आरोप केला जात आहे. यावर बोलताना आज जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया दिली.