राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या आठ दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. तब्येत ठिक नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
आठ दिवसानंतर आज शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिर्डी येथे दोन दिवसीय राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर झाले. या शिबिराला शरद पवार यांनी रुग्णालयातून एक दिवस बाहेर येऊन हजेरी लावली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
Sharad Pawar: 'शरद पवारांच्या इच्छाशक्तीला सलाम', मनसेच्या प्रवक्त्याचं हात जोडून नमन
शरद पवार यांची प्रकृती दिवाळीच्या पाडव्यानंतर बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यानच्या काळातील त्यांचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबीर शिर्डी येथे आयोजित करण्यात आलं होतं. आता, या शिबिराला शरद पवार उपस्थित राहतील की नाही, याबाबत तर्क-वितर्क होते. मात्र, रुग्णालयातून शिर्डीला येत आणि पुन्हा शिर्डीतून रुग्णालयात जाऊन शरद पवारांनी पुन्हा एकदा पावसाच्या सभेची आठवण करुन दिली. शरद पवारांची ही ऊर्जा पाहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही अप्रुप वाटू लागलं. सोशल मीडियावरही त्यांचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं.