Join us

शरद पवारांची प्रकृती ठणठणीत, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 5:35 PM

यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन माहिती दिली

ठळक मुद्देशरद पवार यांना 20 एप्रिल रोजी सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीयमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयाचा त्रास जाणवत असल्याने यापूर्वी शरद पवार यांच्यावर दोनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी (२० एप्रिल) सायंकाळी शरद पवार यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. (nawab malik says sharad pawar was admitted at breach candy hospital last evening). आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस ते घरीच आराम करणार आहेत, असे नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलंय. 

शरद पवार यांना 20 एप्रिल रोजी सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते, तेव्हापासून ते रुग्णालयातच होते. दरम्यान, रुग्णालयात असले तरी राज्यातील कोरोना परिस्थितीवर ते बारीक लक्ष ठेऊन असतात. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीही त्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून राज्यातील रेमडीसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा याबाबत माहिती घेतली होती.   

टॅग्स :शरद पवारनवाब मलिककोरोना वायरस बातम्यामुंबईराष्ट्रवादी काँग्रेस