शरद पवार लोकसभेच्या मैदानात उतरणार, माढ्यातून निवडणूक लढणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 10:10 AM2023-10-20T10:10:23+5:302023-10-20T10:11:21+5:30
देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
मुंबई- देशात काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, सर्व पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेमधील शरद पवार गटानेही लोकसभेची तयारी सुरू केली आहे. काल मुंबईत शरद पवार गटाची बैठक झाली, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत माढा लोकसभा मतदार संघाचीही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
ही संधी घालवू नका! इस्रायलवर दबाव निर्माण करणे गरजेचे, भारत हे करू शकतो
खासदार शरद पवार पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत माढा मतदार संघातून खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. यावर काल प्रदेशाध्यक्षव जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, माढा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या नावाचीही मागणी केली आहे, प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकारी नेत्यांच्या उमेदवारीची मागणी करत असतात. नावे सुचवत असतात. अजून ही पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. या सर्वाचा आम्ही विचार करु आणि योग्य तो उमेदवार देऊ, असंही जयंत पाटील म्हणाले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळीही माढा लोकसभा निवडणुकीत खासदार शरद पवार यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा झाली होती. यापूर्वी शरद पवार यांनी २००९ साली माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, यावेळी ते मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यावेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीत अजित पवार यांनी यांच्यासह नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे. अजित पवार गटातही लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू आहे.