Sharad Pawar: जिंकलो!!! शरद पवारांचं सेलिब्रेशन; सुप्रिया सुळेंनी शेअर केला खास व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 12:13 AM2022-08-29T00:13:25+5:302022-08-29T00:15:59+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा घरी बसून आनंद घेतला.

Sharad Pawar: won!!! Sharad Pawar's celebration team india's victory; Supriya Sule shared a special video of india vs pakistan match, india won | Sharad Pawar: जिंकलो!!! शरद पवारांचं सेलिब्रेशन; सुप्रिया सुळेंनी शेअर केला खास व्हिडिओ

Sharad Pawar: जिंकलो!!! शरद पवारांचं सेलिब्रेशन; सुप्रिया सुळेंनी शेअर केला खास व्हिडिओ

googlenewsNext

मुंबई - जगभराचं लक्ष लागलेल्या आणि कोट्यवधी भारतीयांचा श्वास काही काळासाठी रोखून धरलेल्या सामन्यात अखेर भारताने विजयी षटकार ठोकलाच. हार्दीक पांड्याने शेवटच्या षटकातील ४ थ्या चेंडूवर षटकार उंचावताच भारतीयांचा एकच जल्लोष सुरु झाला. दुबईच्या स्टेडियमसह घराघरात आणि मनामनात हार्दीक अभिनंदन म्हणत विजयाचा आनंदोत्सव पाहायला मिळाला. देशातील अनेक महानगरांमध्ये रस्त्यावर येऊन तरुणाईचा जल्लोष सुरु झाला आहे. विशे, म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीही या जल्लोषात स्वत:ला सहभागी करुन घेतल्याचं पाहायला मिळालं. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा घरी बसून आनंद घेतला. अखेरच्या षटकापर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या या रोमहर्षक सामन्यातील शेवटच्या षटकात ४ थ्या चेंडूवर हार्दीक पांड्याने षटकार ठोकताच, शरद पवारांनी हात उंचावत जल्लोष साजरा केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शरद पवार हे आपल्या नातवांसोबत टीव्हीवर मॅच पाहताना दिसत आहेत. 

भारताची विजयी सलामी

आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने दिलेल्या १४८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून भारतीय संघाने ही किमया साधली. पाकिस्तानने १९.५ षटकांत सर्वबाद १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात निराशाजनक झाली मात्र अखेर जडेजा आणि पांड्याच्या संयमी खेळीने भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने विजयी षटकार लगावून भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. 
 

Web Title: Sharad Pawar: won!!! Sharad Pawar's celebration team india's victory; Supriya Sule shared a special video of india vs pakistan match, india won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.