मुंबई - गेली ९३ वर्षे नागरीकरण बळकट करण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत आहे. या संस्थेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या ‘आम्ही लोकप्रतिनिधी-आमची जबाबदारी’ हे पुस्तक शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेट दिले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, महासंचालक डॉ. जयराज फाटक, मानद संचालक लक्ष्मणराव लटके, स्वीय सचिव निधी लोके यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन हे पुस्तक त्यांना भेट दिले.
यावेळी रणजित चव्हाण व डॉ. जयराज फाटक यांनी
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना प्रशिक्षण देणे, महानगर पालिका, नगरपालिका यांच्यासाठी सॅनेटरी इन्स्पेक्टर, नर्सिंग, फायर ऑफिसर, एलएसजीडी व अन्य अभ्यासक्रम, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नागरीकरणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे काम ही संस्था करीत आहे.
संस्थेच्या कामकाजासंबंधी व नव्याने सुरू केलेल्या प्रकल्पासंबंधीची शरद पवार यांना रणजित चव्हाण व डॉ. जयराज फाटक यांनी सविस्तर माहिती दिली.
रणजित चव्हाण यांच्या कामाचे शरद पवार यांनी यावेळी कौतुक केले. बडोदरा येथे मराठा समाजाच्या वतीने ‘श्री मल्हार म्हाळसाकांत मराठा मंगल कार्यालय संगठन’ उभारण्याचेही काम सुरू आहे. या वास्तूला भेट द्यावी अशी रणजित चव्हाण यांनी केलेली विनंती त्यांनी मान्य केली आणि लवकरच येथे भेट देण्याचे आश्वासन दिले.