Cyclone Nisarga: शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना सूचना तर सुप्रिया सुळेंची नागरिकांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 01:06 PM2020-06-03T13:06:55+5:302020-06-03T13:09:30+5:30

मुंबईच्या अरबी समुद्रात मंगळवारपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ ९० ते १२० च्या वेगाने घोंघावत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्हयांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.

Sharad Pawar's instructions to the activists and Supriya Sule's request to the citizens | Cyclone Nisarga: शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना सूचना तर सुप्रिया सुळेंची नागरिकांना विनंती

Cyclone Nisarga: शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना सूचना तर सुप्रिया सुळेंची नागरिकांना विनंती

Next

मुंबई - 'निसर्ग' चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे रहावे असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना विनंती करत, काळजी घेण्याचं सूचवलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहनही सुळे यांनी केलंय. घाबरुन न जाता सरकारकडून येणाऱ्या सुचनांचे पालन करावे, असेही त्या म्हणाल्या. 

मुंबईच्या अरबी समुद्रात मंगळवारपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ ९० ते १२० च्या वेगाने घोंघावत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्हयांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यांना तडाखा बसला आहेच शिवाय मुंबई, ठाणे यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि होणार आहे. अशावेळी प्रशासन सतर्क राहून काम करत आहेच त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनासोबत मदतीला उतरण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करत, पुढील दोन दिवस घरातून बाहेर न पडण्याचं सांगितलं आहे. त्यानंतर, आता खासदार शरद पवार यांनीही नागरिक व कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. 

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना तात्काळ मदतीचा हात द्यायला हवा, असेही शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांन सांगितले असून प्रशासनासोबत काम करण्याचं सूचवलं आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणीच रहावे. सरकार व प्रशासन आपली सर्वतोपरी काळजी घेत असून स्वत:ही काळजी घ्या, सुरक्षित राहा असे आवाहन नागरिकांना केलंय. 

'सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल'

दरम्यान, अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 0रिस्थितीसंदर्भात माहिती घेतली असून संबंधित यंत्रणांना सूचनाही केल्या आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी स्वत: फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. 

Web Title: Sharad Pawar's instructions to the activists and Supriya Sule's request to the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.