'सरकारच्या कामावर शरद पवारांचे मत परिवर्तन होईल', चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 11:33 AM2023-08-25T11:33:55+5:302023-08-25T11:34:24+5:30
शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
मुंबई- काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली, लोकशाहीत त्यांना त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट म्हणता येणार नाही, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या वक्तव्यावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रीया दिली.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचेही मत परिवर्तन होईल, असा सूचक इशारा दिला आहे. यामुळे आता राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
'वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार,पक्षात फूट पडलेली नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, केंद्र सरकारच्या कामावर शरद पवार यांचे मत परिवर्तन होईल. नरेंद्र मोदींचं नेतृत्व शरद पवार मानतील, वर्षभराच्या कार्यकाळात मोदींच्या नेतृत्वात काम होणार आहे. वर्षभरात केंद्र सरकार मोठे निर्णय घेणार आहेत. या कामामुळे पवार यांच मत परिवर्तन होईल. यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मानतील असंही बावनकुळे म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली, लोकशाहीत त्यांना त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट म्हणता येणार नाही, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. काल खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार हे आमचेचं नेते आहेत, अशी प्रतिक्रीया दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते- सुप्रिया सुळे
काल खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीबाबत प्रतिक्रीया दिली होती. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असे सांगतानाच राज्यात एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. दुसरे कुठले आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? मला माहिती नाही, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. पुणे महापालिकेत मतदारसंघातील प्रश्नासंदभाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.