राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रीया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 04:11 PM2023-07-08T16:11:34+5:302023-07-08T16:12:57+5:30

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत.

Sharad Pawar's reaction to talks of Raj and Uddhav Thackeray getting together | राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रीया, म्हणाले...

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रीया, म्हणाले...

googlenewsNext

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी पडली. या फुटीनंतर राजकीय वर्तुळात गोंधळ सुरू आहे. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी आता मंत्रिपदाची शपथ घेतली, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, यावर आता खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.  

'मला पुतण्या म्हणून एक भीती वाटते'; रोहित पवारांना अजित काकांची वाटतेय काळजी

'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंद आहे, अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता खासदार शरद पवार नाशिक दौऱ्यावर गेले आहेत, येथील येवला येथे पवार सभा घेणार आहेत. येवला हा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. सभेअगोदर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी येवला मतदारसंघासह नाशिक जिल्ह्यातील आठवणी सांगितल्या.छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर त्यांना येवल्याचा मी पर्याय सांगितल्याचे पवार यांनी सांगितले.  

भुजबळांना पराभवानंतर येवल्याचा पर्याय मीच दिला

खासदार शरद पवार म्हणाले, मला इथे आल्यानंतर लोकांचा चेहरा पाहिल्यानंतर समाधान मिळाले. छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर आम्हाला ते विधानसभेत असावेत अशी इच्छा होती. यानंतर आम्ही आमच्या नाशिकच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर इथल्या सहकाऱ्यांनीही येवल्यातून त्यांनी निवडणूक लढवावी असं सुचवलं. १९८६ साली मी काँग्रेसमधून बाहेर पडलो तेव्ही आम्ही काँग्रेस एस पक्ष स्थापन केला. तेव्हा आम्हाला नाशिक जिल्ह्याने जास्त जागा दिल्या. येवला हा आमचा मतदारसंघ आहे, आमच्या विचारांचे लोक निवडून देतात, त्यामुळे इथल्या लोकांची संमती घेतल्यानंतर भुजबळ यांना आम्ही येवल्याचा पर्याय सुचवला, असंही शरद पवार म्हणाले. 

पवार म्हणाले, स्वातंत्र्याच्या इतिहासात नाशिक आघाडीवर होतं. काँग्रेस पक्षाच्या इतिहासात नाशिकला अधिवेशन झालं, हे विसरुन चालणार नाही. शिवाय अनेक नेते या शहरातून घडल्याचं त्यांनी नमूद केलं.वयाच्या मुद्द्यावर बोलताना पवार म्हणाले, यापूर्वी अनेकांनी जोमानं मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. आमच्यासोबत मोरारार्जी देसाई अत्यंत जोमाने काम करायचे. तेव्हा त्यांचं वय ८४ होतं. ते देशाचं किती काम करतात, याची याची चर्चा देशभरात व्हायची. त्यामुळे वयाचा काहीही मुद्दा नसल्याचे शरद पवार म्हणाले.

Web Title: Sharad Pawar's reaction to talks of Raj and Uddhav Thackeray getting together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.