Join us  

'शेअर मार्केटची कृपा', खानोरेंच्या आगळ्या-वेगळ्या बंगल्याची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 6:03 PM

पैसा मिळवणे तशी सोप्पी गोष्ट नाही, आणि ज्यांना मिळतो त्यांच्यासाठी ती अवघडही नाही. मात्र, ज्या क्षेत्रातून किंवा ज्या व्यापारात आपणास पैसा मिळतो, त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतो.

ठळक मुद्देमुकुंद खानोरे असे या तरुण व्यावसायिकाचे नाव आहे. मुकुंद खानोरे हे मूळचे बदलापूरला राहणारे असून कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली.

मुंबई - शेअर मार्केट म्हणजे जुगार, ते आपलं काम नाही असा समज सर्वसामान्य नागरिकांमध्ये असतो. त्यामुळे, शेअर मार्केटचा नाद नको रे बाबा... असे म्हणत आपण शेअर मार्केटपासून दूर राहतो. मात्र, शेअर मार्केटमुळेच कोट्यधीश झालेलीही अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकीच, एक म्हणजे बदलापूर येथील रहिवाशी मुकूंद खानोरे. मुकूंद यांनी शेअर मार्केटच्या व्यापारातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यामुळेच, त्यांनी आपल्या बंगल्याचं नावही 'शेअर मार्केटची कृपा' असं दिलंय. 

पैसा मिळवणे तशी सोप्पी गोष्ट नाही, आणि ज्यांना मिळतो त्यांच्यासाठी ती अवघडही नाही. मात्र, ज्या क्षेत्रातून किंवा ज्या व्यापारात आपणास पैसा मिळतो, त्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असतो. कारण, आपलं पोट त्यावर असल्याचंही आपण ठणकावत सांगतो. म्हणूनच, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुकूंद यांनीही बंगल्याचे नाव 'शेअर मार्केटची कृपा' असे ठेवले आहे. बदलापुरातील या बंगल्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. साधारणपणे बंगल्यावर आपण मुलाचे नाव, आई-वडिलांचे नाव, उद्योग व्यवसायाचे नाव, देवाचे नाव किंवा आपणास आवडेत ते नाव ठेवत असतो. मात्र, मुकूंद यांनी शेअर मार्केट हाच आपला मोठा व्यापार असल्याने बंगल्याचं नाव चक्क 'शेअर मार्केटची कृपा' असे ठेवले आहे. 

मुकुंद खानोरे असे या तरुण व्यावसायिकाचे नाव आहे. मुकुंद खानोरे हे मूळचे बदलापूरला राहणारे असून कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली. त्यानंतर या क्षेत्रात जम बसवत त्यांनी यश मिळवले आहे. खानोरे याच क्षेत्राच्या जोरावर कोट्याधीश बनले आहेत. नुकतीच त्यांनी बदलापूरजवळच्या कासगावमध्ये मोठी जागा विकत घेतली. शेअर मार्केटमुळेच आपल्याला आर्थिक सुबत्ता आणि यश मिळाले असून शेअर मार्केटची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे नाव ठेवल्याके खानोरे यांनी सांगितले. दरम्यान, खानोरे हे शेअर मार्केटचे सेमीनारही घेतात. सोशल मीडियावरही त्यांचे सेमिनार असतात.  

 

टॅग्स :मुंबईशेअर बाजारबदलापूर