राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पूरग्रस्त भागाचा करणार दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 10:14 PM2019-08-13T22:14:33+5:302019-08-13T22:14:49+5:30
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत.
मुंबईः राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. शर्मिला ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता पुराचा तडाखा बसलेल्या सांगलीतल्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता त्या सांगलीतल्या ग्रेट मराठा हॉटेलमध्ये जाणार आहेत. तसेच दुपारी 2 वाजता सांगलीतल्या पूरबाधित लोकांची भेट घेऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.
संध्याकाळी 4 वाजता मिरज शहरातल्या कृष्णा घाट परिसरातील पूरग्रस्त लोकांची भेट घेऊन जनावरांच्या छावणीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर 5 वाजता त्या कोल्हापूरच्या दिशेनं रवाना होणार आहेत. कोल्हापुरातल्या पुराच्या विळख्यात सापडलेल्या शिरोळ, टाकवडे, इचलकरंजीतल्या पूरबाधित लोकांनी संध्याकाळी 6 वाजता भेट घेणार आहेत. कोल्हापुरातल्या पुराची पाहणी करून झाल्यानंतर त्या साताऱ्याकडे मार्गस्थ होणार आहेत, साताऱ्या पोहोचल्यानंतर तिथेही त्या पूरग्रस्त लोकांना भेट देऊन त्यांना मदत करणार आहेत.