महापरिनिर्वाणाला येताना शिस्तीने या...
By admin | Published: December 3, 2014 02:31 AM2014-12-03T02:31:33+5:302014-12-03T02:31:33+5:30
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी शिस्तीने चैत्यभूमीला यावे,
दादर : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी शिस्तीने चैत्यभूमीला यावे, असे आवाहन महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी केले आहे़
या समितीच्या वतीने अनुयायांसाठी सोयी-सुविधा देण्याचे काम गेली अनेक वर्षे केले जाते़ महापरिनिर्वाण दिनाला डॉ़ आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे़ यासाठी केवळ मुंबईतूनच नव्हे तर देशातून आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीत दाखल होतात़ तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी समिती नेहमी नियोजनबद्ध आखणी करते़ आंबेडकर अनुयायी नेहमीच शिस्तीचे पालन करतात़ मात्र ही शिस्त अजून चांगली व्हावी व महापरिनिर्वाण दिवसाचे गांभीर्य अधिक प्रभावाने पाळले जावे यासाठी समितीने हे आवाहन केले असल्याचे कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़
आंबेडकर अनुयायी हे खेड्यापाड्यातून कित्येक मैल प्रवास करून येथे येतात़ त्यांची गैरसोय होऊ नये व शहरी अनुयायांनी त्यांना सहकार्य करावे़ कारण आतापर्यंत या दिवसाला गालबोट लागेल असा एकही अनुचित प्रकार झालेला
नाही़ ही पंरपरा यापूढेही अशीच राहावी, हा यामागचा मुख्य हेतू असल्याचेही कांबळे यांचे म्हणणे आहे़ (प्रतिनिधी)