कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार! आमदार भातखळकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची सकारात्मक दाद

By मनोहर कुंभेजकर | Published: December 20, 2022 04:26 PM2022-12-20T16:26:21+5:302022-12-20T16:27:07+5:30

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री  म्हणाले की, आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेला रुग्णालयाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

shatabdi hospital of kandivali will be transformed chief minister positive response to mla atul bhatkhalkar question | कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार! आमदार भातखळकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची सकारात्मक दाद

कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयाचा कायापालट होणार! आमदार भातखळकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची सकारात्मक दाद

googlenewsNext

मुंबई- कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (शताब्दी) रुग्णालायात सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची गैरसोय होत असून यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज तारांकित प्रश्नाद्वारे केली. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भात बैठक घेऊन मुंबईकरांच्या आरोग्यासाठी जे-जे करावे लागेल ते सर्व पूर्ण करणार असल्याचे ठोस आश्वासन दिले.लोकमतने देखिल अनेकवेळा या हॉस्पिटलच्या दैनावस्थेबाबत आवाज उठवला होता.

उपनगरातील अत्यंत महत्वाचे असलेल्या या रुग्णालयात अतिरिक्त शास्त्रक्रिया विभाग सुरु करावा, पदभरती करावी, औषधे उपलब्ध करून द्यावीत यासह विविध मागण्या आमदार भातखळकर यांनी केल्या. सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे सामान्य रुग्णाला केईएम, सायन रुग्णालयात जावे लागते. यावरील  उपाययोजनांसाठी कालबद्ध धोरण ठरवण्यासाठी बैठक घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री  म्हणाले की, आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेला रुग्णालयाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता कार्यवाही करू. मुंबईकरांचे आरोग्य उत्तम कसे राहील हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे. यापूर्वीच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशी अवस्था निर्माण झाली आहे. लवकरच यासंदर्भात आमदार,  संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्यासाठी जे-जे म्हणून करावे लागेल ते सर्व करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shatabdi hospital of kandivali will be transformed chief minister positive response to mla atul bhatkhalkar question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.