शेव, गाठिया पक्ष्यांच्या मुळावर!

By admin | Published: March 29, 2015 12:48 AM2015-03-29T00:48:24+5:302015-03-29T00:48:24+5:30

लाखो मैल अंतर पार करीत गिरगाव चौपाटी येथे दाखल होणाऱ्या सीगल पक्ष्यांना मुंबईकर टाकत असलेले शेव, गाठिया आणि कुरकुरे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ पाहुण्यांच्या मुळावर उठत आहेत.

Shave, Vaghela on the face of birds! | शेव, गाठिया पक्ष्यांच्या मुळावर!

शेव, गाठिया पक्ष्यांच्या मुळावर!

Next

सचिन लुंगसे ल्ल मुंबई
लाखो मैल अंतर पार करीत गिरगाव चौपाटी येथे दाखल होणाऱ्या सीगल पक्ष्यांना मुंबईकर टाकत असलेले शेव, गाठिया आणि कुरकुरे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ पाहुण्यांच्या मुळावर उठत आहेत.
युरोप, सैबेरियासारख्या देशांत जेव्हा कडाक्याचा हिवाळा सुरू होतो अथवा जोरदार हिमवृष्टी सुरू होते, तेव्हा तेथील कीटक अथवा जीवजंतू सुप्त अवस्थेत जातात. हे जीवजंतू तेथे वास्तव्य करणाऱ्या सीगल पक्ष्यांचे खाद्य असते. परंतु दरम्यानच्या काळात कडाक्याचा हिवाळा आणि हिमवृष्टीमुळे टिकून राहण्यासाठी सीगल पक्षी स्थलांतरणाचा मार्ग अवलंबतात आणि लाखो किलोमीटरचे अंतर कापत ते भारतात दाखल होतात.
सीगल पक्षी भारतात दाखल होण्याचा कालावधी हा सप्टेंबर महिन्याचा असतो. सप्टेंबर महिन्यापासून पुढील सहाएक महिने हे पक्षी भारतात वास्तव्य करतात आणि मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत ते पुन्हा आपल्या मायदेशी परतात. सीगल जेव्हा थव्याने भारतात दाखल होतात, तेव्हा ते विखरतात. कोकण किनारपट्टीपासून मुंबईमधील गिरगाव चौपाटीवर सीगल पक्ष्यांचे थवे आढळून येतात. गिरगाव चौपाटीवर सीगल पक्ष्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर असते.
निसर्गमित्र विजय अवसरे यांच्या म्हणण्यानुसार, सीगल पक्ष्याला शेव, गाठिया आणि चायनिजसाठी वापरली जाणारी शेव, कुरकुरे असे खाद्य पुरवून आपण त्यांचे नुकसान करीत आहोत. कारण मुळातच सीगल पक्ष्यांचे ते खाद्य नाही. हे पक्षी मायदेशातून जेव्हा स्थलांतरित होतात, तेव्हा तेथे जेथे कुठे वास्तव्य करतील तेथे ते मायदेशी परतण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणून पाण्यातील जीवजंतंूसह छोट्या-मोठ्या माशांचे सेवन करतात. मात्र गिरगाव चौपाटीवर सध्या वास्तव्यास असलेल्या सीगल पक्ष्यांना तेलकट खाद्य पुरविले जाते आणि ते त्यांचे नुकसान करणारे आहे. कारण मायदेशी परतण्यासाठी त्यांना आवश्यक असणारी ऊर्जा या पदार्थांतून मिळत नाही.
परिणामी मायदेशी परतण्यासाठी सीगल पक्षी जेव्हा लाखो किलोमीटरचा प्रवास सुरू करतील तेव्हा मात्र पुरेशी ऊर्जा नसल्याने त्यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो, असे अवसरे यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अद्याप अशा प्रकरणांत सीगल पक्ष्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही किंवा तसा पुरावाही नाही. परंतु याबाबत प्राथमिक पातळीवर आपण स्वत: काम सुरू केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

१सीगल पक्षी जेव्हा समुद्रकिनारी वास्तव्य करतो, तेव्हा त्याचे खाद्य प्रामुख्याने पाण्यातील जीवजंतू हे असते आणि याच खाद्याच्या जोरावर तो आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवीत असतो. हीच ऊर्जा त्याला मायदेशी परतण्यासाठी उपयोगी पडणारी असते.
२परंतु सद्य:स्थितीमध्ये गिरगाव चौपाटीवर वास्तव्यास असलेल्या सीगल पक्ष्यांना येथे येणाऱ्या नागरिकांकडून शेव, गाठिया आणि चायनिजसाठी वापरली जाणारी शेव, कुरकुरे असे काहीसे पदार्थ खाद्य म्हणून टाकले जातात.

Web Title: Shave, Vaghela on the face of birds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.