नव्या वर्षात दाढी, केस कापणे २५ टक्क्यांनी महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 05:18 AM2018-12-02T05:18:57+5:302018-12-02T12:09:53+5:30

राज्यातील सलून व ब्युटी पार्लरमध्ये १ जानेवारी २०१९ पासून २५ टक्क्यांनी दरवाढ होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने शनिवारी केली आहे.

Shaving of hair, hair cutting by 25% in new year | नव्या वर्षात दाढी, केस कापणे २५ टक्क्यांनी महागणार

नव्या वर्षात दाढी, केस कापणे २५ टक्क्यांनी महागणार

googlenewsNext

- चेतन ननावरे 

मुंबई : राज्यातील सलून व ब्युटी पार्लरमध्ये १ जानेवारी २०१९ पासून २५ टक्क्यांनी दरवाढ होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने शनिवारी केली आहे. दादर येथील बैठकीत संघटनांनी हा निर्णय घेतला असून १ जानेवारीपासून राज्यात ही दरवाढ लागू होईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय अनारसे यांनी ‘लोकमत’ला दिली.
दादर येथील वीर कोतवाल उद्यानात स्वातंत्र्यसेनानी भाई कोतवाल यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी महामंडळ व असोसिएशनचे पदाधिकारी एकत्रित आले होते. त्यानंतर महामंडळाच्या सभागृहातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय अनारसे म्हणाले, प्रत्येक हेअर स्टाईलिस्ट सलून व ब्युटी पार्लरच्या प्रकारानुसार दर आकारतात. त्या दरांमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर कमाल २५ टक्क्यांनी वाढ करण्याची परवानगी महामंडळ व असोसिएशनने दिली. सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण म्हणाले की, सौंदर्य प्रसाधनांसहित महागाई वाढल्यानेच दोन वर्षांनंतर ही दरवाढ करण्यात आली आहे.
>...म्हणूनच दरवाढ
२८ टक्के जीएसटीमुळे ब्रँडेड सौंदर्य प्रसाधने व ब्लेड, कैची, वस्तरा अशा विविध साधनांच्या किमतींत वाढ झाली आहे.
सलून व ब्युटी पार्लरसाठी आवश्यक आरोग्य परवान्याचे शुल्कही वाढले आहे.
सलून व ब्युटी पार्लरमध्ये सर्वाधिक आवश्यक असलेल्या पाणी बिल व वीज बिलात वाढ झाली आहे.९० टक्क्यांहून अधिक दुकाने भाडे तत्त्वावर चालविली जात असून दुकान भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ होत आहे.

Web Title: Shaving of hair, hair cutting by 25% in new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.