बलात्काराची तक्रार तिने स्वत:च मागे घेतली
By admin | Published: December 10, 2014 01:57 AM2014-12-10T01:57:40+5:302014-12-10T01:57:40+5:30
मुंबईतल्या एका तरुणीने स्वत:च केलेली बलात्काराची तक्रार रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली़
Next
हायकोर्टाची मंजुरी : तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून उचलले पाऊल
अमर मोहिते - मुंबई
रोजच्या बलात्काराच्या घटनांनी महिला असुरक्षितेचा मुद्दा वारंवार पुढे येत असताना मुंबईतल्या एका तरुणीने स्वत:च केलेली बलात्काराची तक्रार रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली़ विशेष म्हणजे कथित आरोपीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आपण केलेली तक्रार रद्द करा, अशी पुष्टीही या तक्रारदार तरुणीने जोडली़ अखेर न्यायालयाने तरुणीची विनंती मान्य करीत बलात्काराची तक्रार रद्द करून अटकेत असलेल्या त्या तरुणाला सोडण्याचे आदेश दिल़े
सध्या वकिली करीत असलेल्या या तरुणीने मे 2क्14 मध्ये वर्सोवा पोलीस ठाण्यात ही तक्रार केली़ त्याची दखल घेत पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला व त्या तरुणाला अटक केली़ सध्या हा तरुण आर्थर रोड कारागृहात आह़े मात्र ही तक्रार रद्द करून त्या तरुणाची सुटका करावी, अशी मागणी करीत तक्रारदार तरुणीने थेट न्यायालयाचेच दार ठोठावल़े
न्या़ व्ही़ एम़ कानडे यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली़ त्यात सरकारी वकील संदीप शिंदे यांनी या मागणीला विरोध केला़ बलात्काराचा गुन्हा गंभीर आह़े अशा घटना वारंवार होत असून, नागरिकांमध्ये असंतोष आह़े असे असताना बलात्काराची तक्रार नोंदवून ती रद्द करण्यासाठी पुन्हा त्याच तरुणीने न्यायालयात यावे, हे गैर आह़े ही तक्रार रद्द झाल्यास समाजात याचा चुकीचा संदेश जाईल व पोलिसांचेही खच्चीकरण होईल़ तेव्हा ही तक्रार रद्द करू नये, अशी विनंती अॅड़ शिंदे यांनी केला़
न्यायालयासमोरील तरुणीचे स्पष्टीकरण
च्न्यायालयाने त्या तरुणीला तक्रार रद्द करण्याचे कारण विचारल़े ‘त्याने’ रावणासारखे वर्तन केले म्हणून मीही तसे वर्तन करावे, हे योग्य नाही़ मग माङयात आणि त्याच्यात काहीच फरक राहत नाही़ माझा तसा स्वभाव नाही़ तसेच तक्रार दाखल केल्यानंतर त्याने खूप सोसले आह़े त्यामुळे त्याचे पुढील आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये व त्याचे कुटुंब यात भरडले जाऊ नये, म्हणून ही तक्रार रद्द करावी, असे उत्तर त्या तरुणीने न्यायालयात दिल़े अखेर न्यायालयाने ही तक्रार रद्द करीत त्या तरुणाला सोडण्याचे आदेश पोलिसांना दिल़े