पाणी वाचविण्यासाठी ‘ती’ धावतेय जग; २० देश फिरून करणार जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:09 AM2018-12-14T01:09:58+5:302018-12-14T01:10:31+5:30

पाण्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी रनिंग ड्राय अभियानाच्या वतीने धावपटू मीना गुली यांनी १०० दिवस १०० मॅरेथॉन धावण्याचा निर्णय घेतला.

'She' running the world to save water; Public awareness to revive 20 countries | पाणी वाचविण्यासाठी ‘ती’ धावतेय जग; २० देश फिरून करणार जनजागृती

पाणी वाचविण्यासाठी ‘ती’ धावतेय जग; २० देश फिरून करणार जनजागृती

googlenewsNext

मुंबई : पाण्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी रनिंग ड्राय अभियानाच्या वतीने धावपटू मीना गुली यांनी १०० दिवस १०० मॅरेथॉन धावण्याचा निर्णय घेतला. मॅरेथॉनमार्फत पाणी प्रश्नावर प्रकाश टाकत संपूर्ण जगामध्ये पाण्याची जनजागृती गुली करत आहेत. गेट वे आॅफ इंडिया येथे नुकतीच त्यांनी भेट देऊन पाण्याविषयी जनजागृती केली. मीना गुली यांनी यासंदर्भात सांगितले की, माझ्या प्रवासामुळे मला अनेक लोकांना भेटण्याची आणि आपल्या जगामधल्या पाणी टंचाईच्या वास्तविक परिणामांना पाहण्याची संधी मिळाली. आपल्यापैकी बहुतांश लोक पाणी नक्की कुठून येते या संकल्पनेबद्दल अज्ञानी आहेत. जगभरात पाण्याची समस्या अगदी टोकावर पोहोचली आहे. कारण लोकसंस्थेचा पडणारा ताण, कृषी सिंचन आणि हवामान बदलाचा परिणाम जबाबदार आहे.

२० देशांमध्ये फिरून पाण्यासंबंधी जनजागृती केली जात आहे. २० देशांमध्ये भारत हा सहावा देश होता. भारतात आल्यावर
गुली यांनी नवी दिल्लीपासून मॅरेथॉनला सुरुवात केली. हरयाणा, राजस्थान, गुजरात येथील विविध भागांत भेट देऊन पाण्याची जनजागृती केली.

१०० दिवसांत १०० शहर धावणार
एका दिवसामध्ये मीना गुली या ४२ किलोमीटर धावतात. आतापर्यंत त्यांनी पाच देश पादाक्रांत केले. भारत हा त्यांचा सहावा देश होता. आता त्या भारतातून हाँगकाँगला रवाना झाल्या असून तिथे पाण्याची जनजागृती करणार आहेत.

Web Title: 'She' running the world to save water; Public awareness to revive 20 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.