शीनाची हत्या गळा आवळूनच
By admin | Published: December 25, 2015 12:50 AM2015-12-25T00:50:20+5:302015-12-25T00:50:20+5:30
इंद्राणी मुखर्जी हिची कन्या शीना बोरा हिची हत्या गळा आवळूनच करण्यात आल्याचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) आपल्या अहवालात म्हटले आहे.
नवी दिल्ली : इंद्राणी मुखर्जी हिची कन्या शीना बोरा हिची हत्या गळा आवळूनच करण्यात आल्याचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) आपल्या अहवालात म्हटले आहे.
एम्सच्या फोरेन्सिक मेडिसीन मंडळातील तज्ज्ञांनी आपला अंतिम अहवाल सीबीआयला सादर केला आहे. त्यात शीना बोराच्या मृत्यूचे कारण गळा आवळणे हेच असल्याचे नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती एम्सच्या सूत्रांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर
दिली.
सीबीआयने गेल्या आॅक्टोबरमध्ये शीनाचा जळालेला सांगाडा एम्सच्या फोरेन्सिक मेडिसीन विभागाकडे दिला होता. त्यानंतर फोरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या पथकाने या सांगाड्याची किमान महिनाभर चाचणी आणि तपासणी केली आणि त्यानंतरच शीनाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.
यासंदर्भात डॉ. गुप्ता यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. (वृत्तसंस्था)
शीनाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांच्या या पथकाने इलिमिनेशन प्रोसेसचा वापर केल्याचा दावा रुग्णालयाच्या सूत्रांनी केला आहे. शीनाची कवटी कुठेही तुटलेली नव्हती आणि कवटीवर एकही भेग आढळून आली नाही. त्यामुळे डोक्याला झालेल्या जखमेमुळे आणि गोळी लागून शीनाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता या सूत्रांनी फेटाळून लावली.