मुंबई : लॉकडाऊनमुळे उपासमार होत असलेल्या मजूर, कामगार वर्गाच्या मदतीसाठी नागरी संरक्षण विभागाने (सिव्हिल डिफेन्स) पुढाकार घेतला आहे. वर्सौवा येथील मैदानावर उभारलेल्या निवारा केद्रांत २८२ मजूर व गरजू व्यक्तींना आसरा देण्यात आला आहे. याठिकाणी गरजूना अन्नदानासह सर्व प्रकारची मदत दिली जात असून मुंबई महापालिकेचे वैद्यकीय पथक त्यांच्या दिमतीला कार्यरत आहे.
विविॆध स्वंयसेवी संस्थाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोना वायरसमुळे अभुतपुर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.त्याच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी १४ एप्रिलपर्यत लाँकडाऊन जाहीर केल्याने कामगार ,गरीब वर्गाचे हाल होत आहे.त्यामुळे सिव्हिल डिफेन्सचे महासमादेशक संजय पांण्डये यांनी त्याच्यासाठी विभागाच्या वतीने मदत कार्य सुरू केले आहे. त्यासाठी अमीन पवार यांनी निवारा केद्र बनविण्यासाठी तंबूला लागणार्या सर्व साहित्याचा पुरवठा केला. रिलायन्स फौडेशनच्यावतीने मदत पुरविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नसिम सिद्धीकी ,इस्काँनच्यावतीने मुंबई,ठाणे व रायगड जिल्हातील कष्टकरी वर्गाला मदत पोहचविली जात आहे. त्यांना रोज दोन हजार मास्कचे वाटप करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या एल वॉर्डच्या एका अधिका-याने सांगितले की, जेव्हा लॉकडाऊन करण्यात आले तेव्हा अनेक लोक लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरात अडकले होते. आम्ही त्यांना सुरुवातीला वांद्रे येथील टिचर्स कॉलनीमधील शेल्टरमध्ये स्थलांतरित केले. त्यानंतर काही लोकांना वर्सोवा येथील शेल्टरमध्ये स्थलांतरित केले. काही लोकांना कामगार नगर येथील शाळेत ठेवले होते. त्यांना स्थलांतरित करताना बेस्ट बसची मदत घेण्यात आली. संबंधित लोकांना वेळेवर जेवण दिले जात आहे. आवश्यक सेवा सुविधा दिल्या जात आहेत.