मुंबई : ‘कार्टून्स कंबाइन्स’तर्फे शनिवारी ज्येष्ठ मराठी व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांना व्यंगचित्रकला क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच दिवशी, कोलकता येथील एका प्रकाशन संस्थेच्या वतीनेही शि. द. फडणीस यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. परंतु, दोन्ही सोहळे एकाच दिवशी असल्याने शि.द. फडणीस यांनी मराठी व्यंगचित्रकार संमेलनाला उपस्थित राहण्याचे ठरविले. कोलकाता येथील ‘बुकफार्म’बुकफार्म या प्रकाशन संस्थेतर्फे कॉमिक्स ओ ग्राफिक्स हा बंगाली भाषेतील कार्टून संग्रह प्रकाशित करण्यात आला. या समारंभात यंदाचा जीवनगौरव पुरस्कार शि.द.फडणीस यांना देण्यात आला. या प्रसंगी, या विषयातील तज्ज्ञ समीक्षक डॉ. कौशिक मुजूमदार यांनी शि.द. यांच्या व्यंगचित्रकलेवर स्लाईडसह व्याख्यान दिले.या सोहळ््याला मान्यवर चित्रकार संपादक प्रकाशक व चित्रपट , संगीत इ. क्षेत्रातील मंडळींचा सहभाग होता. या सोहळ््यात फडणीस यांनी दृकश्राव्य ध्वनीफितीद्वारे आभार मानले. (प्रतिनिधी)
शि. द. फडणीस यांचा दुहेरी सन्मान
By admin | Published: April 18, 2016 1:59 AM