हाय फ्रिक्वेन्सी रिसिविंग स्टेशन गोराईला शिप्ट करा, आशिष शेलार यांची हवाई वाहतूक मंत्र्यांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: July 24, 2024 08:48 PM2024-07-24T20:48:19+5:302024-07-24T20:49:27+5:30

Mumbai News: मुंबई विमानतळाच्या हाय फ्रिक्वेन्सी रिसीविंग स्टेशनमुळे परिसराताल इमारतींचा पुनर्विकास रखडला असून सदर स्टेशन गोराई येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची दिल्लीत भेट घेतली.

Shift High Frequency Receiving Station to Gorai, Ashish Shelar's demand to Air Transport Minister | हाय फ्रिक्वेन्सी रिसिविंग स्टेशन गोराईला शिप्ट करा, आशिष शेलार यांची हवाई वाहतूक मंत्र्यांकडे मागणी

हाय फ्रिक्वेन्सी रिसिविंग स्टेशन गोराईला शिप्ट करा, आशिष शेलार यांची हवाई वाहतूक मंत्र्यांकडे मागणी

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबई विमानतळाच्या हाय फ्रिक्वेन्सी रिसीविंग स्टेशनमुळे परिसराताल इमारतींचा पुनर्विकास रखडला असून सदर स्टेशन गोराई येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची दिल्लीत भेट घेतली.

अंधेरी पश्चिम, वर्सोवा, जूहु तसेच दहिसर या परिसरातील इमारतींचा पुनर्विकास रखडला असून मुंबई विमानतळाचे  हाय फ्रिक्वेन्सी सेंटरच्या टाँवरमुळे या भागातील रहिवाशांना इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी मिळत नाही. हा प्रश्न भाजपा आमदार अमित साटम, आमदार मनिषा चौधरी गेली अनेक वर्षे सातत्याने मांडत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही याबाबतचे पत्र आणि सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.

मुंबईतील सुमारे ५ लाख हून अधिक रहिवाशांची होणारी गैरसोय आणि त्यांच्या पुनर्विकासातील अडचणी पाहता हे स्टेशन गोराई येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी शेलार यांनी न हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेऊन मुंबईकरांची ही मागणी निदर्शनास आणून दिली.याबाबत सकारात्मक चर्चा झाली असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Shift High Frequency Receiving Station to Gorai, Ashish Shelar's demand to Air Transport Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.