मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरोधात सोने गुंतवणूक योजनेत फसवणूक केल्याचा आरोप करीत एका एनआरआयने खार पोलिसांत तक्रार नोंदविली होती. या प्रकरणी चौकशी सुरू असून, अद्याप दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली नसल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.सोन्याचा व्यवहार करणाºया सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीच्या संचालकपदी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा होते. नंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. सचिन जोशी यांनी मार्च २०१४ मध्ये या कंपनीकडून १८ लाख ५८ हजारांना एक किलो सोने खरेदी केले. या गुंतवणुकीवर त्यांना पाच वर्षांनंतर परतावा मिळणार होता. २५ मार्च २०१९ रोजी योजना संपुष्टात आली. कंपनीचे वांद्रे पूर्व परिसरातील कार्यालयही बंद करण्यात आले. हे तसेच कंपनी संचालकपदावरून शेट्टी, कुंद्रा यांनी राजीनामा दिल्याचे जोशी यांना समजले. त्यानंतर फसवणूकप्रकरणी त्यांनी खार पोलिसांत तक्रार दाखल केली.
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रांवर अद्याप गुन्हा दाखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 6:18 AM