Join us

शिल्पा शेट्टीची माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:07 AM

मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना प्रतिबंध घालण्याची मागणीशिल्पा शेट्टीची उच्च न्यायालयात धावमानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून प्रतिबंध घालण्याची ...

मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना प्रतिबंध घालण्याची मागणी

शिल्पा शेट्टीची उच्च न्यायालयात धाव

मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून प्रतिबंध घालण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पोर्नोग्राफीक फिल्म्सप्रकरणी चुकीचे वार्तांकन करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशाप्रकारे मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या मीडिया हाऊसना वार्तांकन करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात केली आहे.

राज कुंद्रा याच्या अटकेनंतर काही मीडिया हाऊसनी त्यांची रीडरशिप व टीआरपी वाढवण्यासाठी तथ्यहीन लेख लिहिले आणि त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केले, असे शिल्पा शेट्टी हिने या दाव्यात म्हटले आहे.

तिने याप्रकरणी गुगल, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबसह २९ जणांना प्रतिवादी केले आहे. या सर्व सोशल मीडियावरून बदनामीकारक मजकूर हटविण्यात यावा, अशी मागणी तिने केली आहे. तसेच त्यांना सशर्त माफी मागण्याचे व मानहानी म्हणून प्रत्येकी २५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी शिल्पा शेट्टी हिने केली आहे. या दाव्यावरील सुनावणी शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.