Join us  

विरोधकांचा शिमगा!

By admin | Published: March 20, 2015 2:18 AM

: काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या भांडणात राज्यातील सत्ता गेली तरी एकमेकांचे पाणी जोखण्याची संधी त्यांनी अजूनही सोडलेली नाही.

एमएमआरडीएची श्वेतपत्रिका काढा; राष्ट्रवादीची मागणीकाँग्रेस म्हणते, ऊर्जाखात्याची सीबीआय चौकशी करामुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या भांडणात राज्यातील सत्ता गेली तरी एकमेकांचे पाणी जोखण्याची संधी त्यांनी अजूनही सोडलेली नाही. विधान परिषदेच्या सभापती पदावरून दोन्ही पक्षांत निर्माण झालेल्या कटुतेचे पडसाद विधिमंडळातही उमटू लागले आहेत.महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला, तर ऊर्जा खात्यातील भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करा, अशी मागणी करत विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या वर्मावर बोट ठेवले. गुढीपाडव्याच्या तोंडावर विरोधकांमध्ये रंगलेला ‘शिमगा’ पाहून सत्ताधारी बाकांवरील मंडळी सुखावली नाही तरच नवल!दिव्याखाली अंधार!मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये एलईडी दिवे बसविण्यात येतील, अशी घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दिव्यांना असलेला शिवसेनेचा विरोध साफ धुडकावून लावला. मुंबईतील मरिन लाइन्सवर महापालिकेला विश्वासात न घेता एलईडी दिवे बसविण्यावरून शिवसेना-भाजपामध्ये सध्या जुंपलेली आहे. या दिव्यांच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी सेनेच्या मुखपत्रात केला आहे. त्याचेही पडसाद आज विधानसभेत उमटले. खर्च वाढल्याबाबत ‘कॅग’मार्फत लेखापरीक्षण गेल्या १५ वर्षांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने हाती घेतलेले प्रकल्प, त्याचा मूळ खर्च व प्रत्यक्ष वाढलेला खर्च याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी तटकरे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. त्यावर लागलीच नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मेट्रो प्रकल्पाचा खर्च वाढल्याबाबत ‘कॅग’मार्फत लेखापरीक्षण करण्यात येईल, असे सांगितले.विखे यांच्या मागणीने सभागृह झाले अवाक् आमचे भोगच आम्ही सांगतोय... प्रकाशगडचे नाव आता अंधारगड करा, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या महाभ्रष्टाचारी कंपन्या आहेत. आम्ही केले तेवढे महान कार्य तुमच्या हातून तरी घडू नये... ऊर्जा खात्यातील भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करून आमच्या काळात झालेल्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विखे यांनी विधानसभेत करताच सगळे सभागृह अवाक् झाले!