Join us  

Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळाव्यावरून शिमगा, महापालिकेच्या मंजुरीची प्रतीक्षा, कोणत्या गटाचा यावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 7:19 AM

Shiv Sena Dasara Melava: शिवाजी पार्कवर दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाने मेळाव्याची परवानगी मिळावी म्हणून मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे.

मुंबई : शिवाजी पार्कवर दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाने मेळाव्याची परवानगी मिळावी म्हणून मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र, परवानगी देवू नये म्हणून महापालिकेच्या संबंधित सहाय्यक आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांनी केला आहे. आमचा दसरा मेळावा होईलच, असे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करणार का अशी चर्चा या निमित्ताने सर्वत्र सुरू झाली आहे. शिवाजी पार्कवर मेळावा झालाच पाहिजे, हा हिंदुत्वाचा विषय आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून याबाबतचा निर्णय आम्ही घेवू, असे सरवणकर म्हणाले.

मेळावा त्यांचाच होईल : सामंतज्यांनी शिवाजी पार्कवरील मेळाव्याची परवानगी मागितली आहे त्यांचाच मेळावा होईल. त्यात आमची भूमिका असण्याचे कारण नाही, असे शिंदे गटाचे प्रवक्ते व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी धुळे येथे पत्रकारांना सांगितले. आम्हीही शिवसेना म्हणूनच काम करत आहोत, असे ते म्हणाले. 

शिंदे गटाचा सस्पेन्स कायमn शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा असे वर्षानुवर्षांचे समीकरण आहे पण शिवसेनेतील मोठी बंडखोरी आणि त्यातून राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर आता दसरा मेळाव्यावरून वादाचे ढग तयार होवू लागले आहेत. n मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून दसरा मेळावा घेण्यासाठी अद्याप महापालिकेकडे परवानगी मागण्यात आलेली नाही. n शिवाजी पार्क ज्या दादर-माहिम मतदारसंघात येतो आणि तेथील आमदार सदा सरवणकर हे शिंदे गटात आहेत. दसरा मेळाव्यासाठी महापालिकेला मीच दरवर्षी पत्र देत असतो. n मी अद्याप पत्र न दिल्याने महापालिकेने परवानगी दिलेली नसावी, असे पत्रकारांना सांगत सरवणकर यांनी शिंदे गट मेळाव्यासाठी अर्ज करणार की नाही, याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. ते किंवा उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेणार की नाही, याची मला कल्पना नाही. दसरा मेळाव्याबाबत जे नियमात आहे तेच होईल, या सरकारमध्ये नियमाच्या बाहेर जाऊन काहीच होणार नाही.      - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

दसरा मेळाव्याच्या आमच्या अर्जावर निर्णय न घेणे योग्य नाही. खोके सरकार गद्दारी पुढे नेत आहे. परवानगी दिली नाही, तरी शिवतीर्थावर दसरा मेळावा हाेईल. जनता आमच्या सोबत आहे, सोबत राहणार. - आदित्य ठाकरे, शिवसेना नेते  

टॅग्स :शिवसेनादसराराजकारणमुंबई