शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णयांचा धडाका; एक महिन्यात काढले तब्बल ७४९ अध्यादेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 11:46 AM2022-08-02T11:46:30+5:302022-08-02T11:50:04+5:30

सर्वाधिक कोणत्या विभागाचे अध्यादेश आहेत पाहा...

Shinde-Fadnavis government's burst of decisions; As many as 749 ordinances passed in one month | शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णयांचा धडाका; एक महिन्यात काढले तब्बल ७४९ अध्यादेश

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णयांचा धडाका; एक महिन्यात काढले तब्बल ७४९ अध्यादेश

Next

मुंबई: शिवसेनेत झालेल्या प्रचंड मोठ्या बंडखोरीमुळे राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर  शिवसेनेतील बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर भाजप नेते उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. 

या दोन जणांच्या मंत्रिमंडळाला एक महिना पूर्ण झाला असून, या महिनाभरात या नव्या सरकारने ७४९ अध्यादेश जारी केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य सामान्य प्रशासनाला दिले असून, या विभागाचे ९१ अध्यादेश निघाले आहेत. सर्वात कमी २ अध्यादेश पर्यावरण विभागाचे आहेत.

७० अध्यादेश  

१२ जलै रोजी सर्वाधिक ७० अध्यादेश निघाले असून त्यामध्ये सर्वाधिक 
३६ अध्यादेश हे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे १५ अध्यादेश हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आहेत. 

ठळक मुद्दे-

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्यानंतर त्याच दिवशी तब्बल ६३ अध्यादेश जारी केले.  त्यामध्ये सर्वाधिक १४ अध्यादेश हे सामान्य प्रशासन विभागातील आहेत.  त्याखालोखाल सार्वजिनक आरोग्य विभाग (७), शालेय शिक्षण व क्रीडा (६), मृदा व जलसंधारण (६), महसूल व वनविभाग (५), जलसंपदा (५) आणि ग्रामविकास विभागाच्या चार अध्यादेशांचा समावेश आहे. 

महिनाभरात सर्वाधिक ९१ अध्यादेश

सार्वजनिक आरोग्य विभागासाठी काढले आहेत. त्यानंतर पाणीपुरवठा व स्वच्छतेचे ८३, तर सामान्य प्रशासन विभागाचे ६३ आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे ५० अध्यादेश निघाले आहेत.

Web Title: Shinde-Fadnavis government's burst of decisions; As many as 749 ordinances passed in one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.