मुंबई- गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे बदलण्याचा निर्णयावरुन चर्चा सुरू होत्या. या चर्चेवर आज अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय दिला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या बैठकीत या दोन शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली होती. यानंतर या नामांतराच्या मंजुरीसाठी हे प्रकरण केंद्र सरकारकडे गेली होते. आता या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय दिला आहे.
या संदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली.
'औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...! ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...!, असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
काँग्रेस म्हणतेय 'मोदी तेरी कब्र खुदेगी', पण देशातील जनता म्हणतेय...; PM मोदींचा विरोधकांवर पलटवार
नामांतरावरुन भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. महाविकास आघाडीचे नेते भाजपवर टीका करत आरोप करत होते. यावर आता अखेर केंद्राने निर्णय दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’, असा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"